डॉली खन्ना यांचा 'हा' शेअर ठरला कुबेरांचा खजिना! 6 महिन्यात तब्बल अडीच पट परतावा

Dolly Khanna portfolio | डॉली खन्ना यांनी गुंतवणूक केलेला एक स्टॉक गेल्या 6 महिन्यात त्यांच्यासाठी कुबेराचं धन ठरला असून. या स्टॉकने फक्त 6 महिन्यात अडीच पट परतावा दिला आहे.

Updated: Jan 19, 2022, 08:11 AM IST
डॉली खन्ना यांचा 'हा' शेअर ठरला कुबेरांचा खजिना! 6 महिन्यात तब्बल अडीच पट परतावा title=

मुंबई : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओकडे सध्या सर्वांच्या नजरा आहेत. राकेश झुनझुनवाला, आर के दमानी पासून ते डॉली खन्ना यांच्या पोर्टफोलिओमध्ये कोणते बदल झाले आहेत. हे जाणून घेण्यास किरकोळ गुंतवणूकदार उत्सुक असतात. डॉली खन्ना यांनी गुंतवणूक केलेला एक स्टॉक गेल्या 6 महिन्यात त्यांच्यासाठी कुबेराचं धन ठरला असून. या स्टॉकने फक्त 6 महिन्यात अडीच पट परतावा दिला आहे. हा स्टॉक म्हणजे Ajanta Soya Ltd होय.

डॉली खन्ना यांनी Ajanta Soya Ltdच्या शेअरमध्ये 1.1 टक्क्यांची भागिदारी खरेदी केली आहे. अजंता सोयाचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या स्टॉकने 6 महिन्यात गुंतवणूकदारांना अडीच पट परतावा दिला आहे. अजंता सोया कंपनी वनस्पती ऑइल, कुकिंग ऑइल आणि बेकरी ऍप्लिकेशनची मॅन्युफॅक्चरींग आणि मार्केटींगचे काम करते. यामुळे कंपनीच्या प्रोडक्टची मार्केटमध्ये चांगली मागणी आहे.

डॉली खन्ना यांची भागिदारी
बीएसईच्या वेबसाईटवर अजंता सोया लिमिटेडच्या डिसेंबर 2021 तिमाही शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार, डॉली खन्ना यांनी या कंपनीत 1.11 टक्के(178500 इक्विटी शेअर) भागिदारी खरेदी केली आहे. आज डॉली खन्ना यांची होल्डिंग वॅल्यू 4.8 कोटी रुपयांवर आहे.

6 महिन्यात 150 टक्क्यांचा परतावा
दिग्गज गुंतवणूकदार डॉली खन्ना यांनी गुंतवणूक केलेल्या अजंता सोया या स्टॉकने गेल्या  6 महिन्यात जबरदस्त तेजी नोंदवली आहे. या दरम्यान, स्टॉकने गुंतवणूकदारांना 155 टक्क्यांचा बक्कळ परतावा दिला आहे. गेल्या 1 वर्षात या स्टॉकमध्ये 265 टक्क्यांहून जास्त तेजी नोंदवली आहे.