अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित, गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह

Amarnath yatra postponed, flood near cave due to heavy rain : अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. अमरनाथमध्ये गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु झाला आणि पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

Updated: Jul 27, 2022, 07:50 AM IST
अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित, गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह title=

श्रीनगर : Amarnath yatra postponed, flood near cave due to heavy rain : अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित केली आहे. अमरनाथमध्ये गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह सुरु झाला आणि पूरपरिस्थिती निर्माण झालीये, त्यामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. गेल्या वेळी आलेल्या पुरामध्ये भाविकांचा मृत्यू झाला होता त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून  जवळपास 4 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. आता पुढील सूचना येईपर्यंत भाविकांना अमरनाथ यात्रा करता येणार नाही.

अमरनाथ यात्रेवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. पवित्र गुहेजवळ पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भाविकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. जवळपास 4 हजार लोकाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले गेले आहे. 

मंगळवारी जोरदार पाऊस झाला. या पावसाने अमरनाथ पवित्र गुहेभोवती पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोणतही दुर्घटना पुन्हा घडू नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भाविकांना या ठिकाणाहून दुसरीकडे हलविण्यात आले आहे. 

अमरनाथ पंचतर्णी आणि पवित्र गुहेजवळ पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला. त्यामुळे यात्रा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी आलेले अनेकजण नाराज झाले आहे. प्रवासावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. अमरनाथच्या डोंगराळ भागात काल दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जवळच असलेल्या एका लहान नदीच्या पाण्याची पातळी वाढली. यात्रेकरूंना पुन्हा पंचतार्णी छावणीत नेण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे कोणतीही हानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. येथील पूर्ववत झाल्यानंतर ही यात्रा पुन्हा सुरु होईल. मात्र, अमरनाथ यात्रा कधी सुरु होईल, त्याची माहिती देण्यात आलेली नाही. ही यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.