आंबेडकरांचे संविधान धोक्यात आहे- राहुल गांधी

सत्ताधाऱ्यांच्या देखरेखीत संविधान धोक्यात असल्याची भिती कॉंगेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस पार्टीच्या १३३ व्या स्थापना दिनी ते बोलत होते.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 28, 2017, 12:28 PM IST
आंबेडकरांचे संविधान धोक्यात आहे- राहुल गांधी  title=

नवी दिल्ली : सत्ताधाऱ्यांच्या देखरेखीत संविधान धोक्यात असल्याची भिती कॉंगेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. कॉंग्रेस पार्टीच्या १३३ व्या स्थापना दिनी ते बोलत होते.

मोदी सरकारवर निशाणा साधत भाजपा आपल्या राजनितीक फायद्यासाठी खोटे बोलत असल्याचा आरोपही राहुल यांनी केला.

भाजपा खोटे बोलते 

कॉंग्रेस पार्टी आणि आंबेडकर यांनी मिळून संविधान बनविले. त्यामूळे याची रक्षा करणे आमचे कर्तव्य आहे. राजकिय फायद्यासाठी भाजपा खोटे बोलते. हक्कांसाठी लढणे आपले कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

राहुल यांच्या अध्यक्षतेत

राहुल यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच कॉंग्रेस स्थापना दिवस साजरा होत आहे. १८८५ मध्ये कॉंग्रेसची स्थापना झाली. तेव्हापासून दरवर्षी कॉंग्रेस कार्यालयात स्थापना दिवस साजरा केला जातो.