भारतात आलेल्या अमेरिकन युट्युबरने काळीज जिंकलं, रडणाऱ्या आईला दिलं नोटांचं बंडल; पाहा Video

Youtuber Speed Helps Single Mother : अमेरिकन युट्युबर स्पीडने अलीकडेच भारतातील रस्त्यांवरील एका कुटुंबाला पैसे दिले. तुमचा पैसा चांगल्यासाठी कसा वापरायचा याचं एक उत्कृष्ट उदाहरण ठेवलं आहे.

Updated: Oct 22, 2023, 04:16 PM IST
भारतात आलेल्या अमेरिकन युट्युबरने काळीज जिंकलं, रडणाऱ्या आईला दिलं नोटांचं बंडल; पाहा Video title=
Youtuber Speed Helps Single Mother

Youtuber Speed Viral Video : भारतात होत असलेल्या वर्ल्ड कपची (World Cup 2023) जादू पाहण्यासाठी परदेशातून अनेकजण भारताता आले आहेत. टीम इंडियाचा स्टार प्लेयर विराट कोहलीचे फॅन्स देखील जगभरातून भारतात आले आहेत. त्यापैकी एक नाव म्हणजे अमेरिकन प्रसिद्ध यूट्यूबर (American Youtuber) डॅरेन वॅटकिन्स. त्याला तुम्ही स्पीड (IShowSpeed किंवा Speed) म्हणून ओळखता. भारतात आल्यानंतर स्पीडचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. अशातच आता स्पीडचा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या प्रत्येकाच्या काळजाला भिडला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाचंही मन भरून येईल.

ऑनलाईन स्ट्रीमर डॅरेन जेसन वॅटकिन्स ज्युनियर सध्या भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देताना दिसतोय. या वेळी तो भारतातील लोकांना देखील समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अशातच आता स्पीडने एका गरजू आणि गरिब महिलेला मदत करतानाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्पीड त्याच्या कारमधून बाहेर पडतो आणि एका महिलेला भेटतो. त्यावेळी तो चर्चा देखील करतो आणि खिशात हात घालून पैशांचा बंडल काढून महिलाला सोपवतो.

महिलेला त्याची भाषा समजत नाही. मात्र, त्याच्या मदतीची भावना तिच्या लक्षात आली. महिलेला अश्रू अनावर झाले. ती आनंदाने रडत पैसे घेते. यानंतर स्पीड तिला रडू नकोस असं सांगतोय. महिला आपल्या नवऱ्याची तक्रार करते. त्यावेळी लोकांनी तो प्रसिद्ध युट्युबर असल्याचं महिलेला सांगितलं. त्यानंतर पैसे पाहून महिलेला आनंद होतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर sarcasticschool_ या नावाने व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

पाहा Viral Video

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांनी पाहिला असून नेटकऱ्यांनी स्पीडच्या कृतीचं कौतुक केलंय. तर काहींनी स्पीडवर टीका देखील केलीये. मदत करायची तर मनोभावे करावी, व्हिडीओ शूट करून दाखवून देयची गरज नव्हती, अशी टीका देखील नेटकऱ्यांनी केलीये.