नवी दिल्ली : दहिहंडी हा सरकारी उत्सव नाही. त्यामुळे देशभरात हा उत्सव जसा साजरा होईल तसाच, तो उत्तर प्रदेशमध्येही साजरा होईल. उत्तर प्रदेशातील लोक हा सण आपापल्या इच्छेप्रमाणे साजरा करतील, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केले आहे.
गोरखपूर येथील दूर्घटनेबाबत अमित शहा प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, आजचा (गोकुळाष्टमी) दिवस लक्षात घेऊन पत्रकारांनी दहिहंडीबाबत शहा यांना विचारलले होते. दरम्यान,गोकुळाष्टमी हा महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईतील एक महत्त्वपूर्ण सण आहे. या दिवशी दहीहंडी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. दहिहंडीला साहसी क्रीडाप्रकार म्हणून मान्यता द्यावी, असे काही राजकीय पक्ष आणि संघटनांची मागणी आहे.
#Jamanshtami apni jagah hai,jaise desh mein hogi,waise UP mein logon ke personal belief ke aadhar par hogi,yeh govt festival nahi:Amit Shah pic.twitter.com/olUJ2rUYy8
— ANI UP (@ANINewsUP) August 14, 2017
दरम्यान, दहिहंडीला साहसी क्रीडाप्रकार म्हणून मान्यता मिळावी यासाठी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात आले. मात्र, लहान मुलांना अधिक उंचीवर पाठवून कोणते साहस दाखवले जाते, असा उलट सवाल विचारत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना झापले होते.