close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अमित शहांना भारत मुसलमान मुक्त करायचाय- असदुद्दीन ओवैसी

धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न होताना दिसत आहेत. 

Updated: Nov 8, 2018, 02:07 PM IST
अमित शहांना भारत मुसलमान मुक्त करायचाय- असदुद्दीन ओवैसी

हैदराबाद:  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भारत मुसलमान मुक्त करायचाय, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी केले. तेलंगणा येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, अमित शहा काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी हैदराबादला एमआयएम मुक्त करु, असे म्हटले होते. 

मात्र, शहांना कोणाला आणि कुठून मुक्त करायचे आहे. तुम्हाला मजलिस नव्हे तर मुसलमान मुक्त भारत हवाय. ते भारतातील सर्व मुस्लिमांचा नायनाट करू इच्छितात, असे ओवैसी यांनी सांगितले. 

आंध्र प्रदेशपासून विभक्त झाल्यानंतर तेलंगणात पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि एमआयएम या दोन्ही पक्षांकडून धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न होताना दिसत आहेत.