काश्मीरमध्ये चकमक, २ दहशतवादी लपून बसल्याची माहिती

जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सोमवारी सकाळी जवानांनी बारामुलामधील सोपोरच्या शंगर्गंड भागाला घेरलं आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. येथे २ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे.

Updated: Sep 4, 2017, 10:14 AM IST
काश्मीरमध्ये चकमक, २ दहशतवादी लपून बसल्याची माहिती title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. सोमवारी सकाळी जवानांनी बारामुलामधील सोपोरच्या शंगर्गंड भागाला घेरलं आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं. येथे २ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे.

शनिवारी दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील बेहिबागमध्ये जवानांनी चकमकीत एका दहशतवादाला ठार केलं होतं. ठार केलेला दहशतवादी इश्फाक पद्दार लेफ्टिनेंट उमर फयाजच्या हत्येमध्ये सहभागी होता.