जम्मू- काश्मीर : बारामुल्ला येथे कर्तव्यावर असलेल्या एका जवानाने लष्करी कॅम्पमधून एके ४७रायफलीसह पलायन केलेय.
भारतीय लष्कराच्या १७३ व्या तुकडीत झहूर अहमद ठाकूर हा जवान शिपाई पदावर कार्यरत होता. झहूर ठाकूर हा मूळचा पुलवामा जिल्ह्यातीस निवासी आहे. त्याची नेमणूक बारामुल्ला येथे करण्यात आली होती.
लष्कराच्या कॅम्पमधून हा जवान पळाला. त्याने सोबत लष्कराची एके ४७ रायफल आणि तीन मॅगझिन नेल्याचे समोर आले आहे. ठाकूर हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाला असावा, अशी शक्यता आहे.
J&K: Territorial Army jawan Zahoor Thakur missing with a AK-47 from his camp in Baramulla's Gantmulla, Police has begun an investigation. pic.twitter.com/RMg928TNeF
— ANI (@ANI_news) July 6, 2017
या जवानाने पलायन केल्याचे समोर येताच उत्तर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सैन्याच्या पथकांनी शोधमोहीम सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, हा जवान हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण हिज्बुल मुजाहिद्दीनने दावा केलाय की पोलीस कॉन्स्टेबल आम्हाला सामील झालाय.