आसाम : एक 22 वर्षांचा तरुण मुलगा होता आणि त्याची प्रेयसी अवघ्या 17 वर्षा, तिने त्या मुलाला विचारला, "मी माझ्या आईला आपल्या भविष्याबद्दल काय सांगणार?" तेव्हा त्या तरूण मुलाने उत्तर दिले, "तुझ्या आईला सांगा, मी एक दिवस मुख्यमंत्री (CM) होणार आहे." आणि तो मुलगा नंतर खरोखरच एका राज्याचा मुख्यमंत्री झाला. ही कहाणी ऐकून तुम्हाला वाटेल की, ही कोणत्यातरी सिनेमातील कहाणी आहे. कारण हे खऱ्या आयुष्यात होणे शक्य नाही. परंतु जर आम्ही सांगितले की, ही कहाणी खऱ्याखूऱ्या आयुष्यातली आहे, तर तुम्हाला विश्वास बसेल? नाही ना? परंतू ही कहाणी खरी आहे. आणि ही कहाणी आहे, आसामचे नवे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा (Himanta Biswa Sarma) यांची.
हिमंता बिस्वा सर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी 9 वर्षांपूर्वी रिनिकी भुइयां (Riniki Bhuyan) या त्यांच्या प्रेयसीला सांगितले होते की, ते एक दिवस मुख्यमंत्री होणार आहेत आणि ही गोष्ट त्यांनी खरी करु दाखवली. रिनिकी भुइयां या आता हिमंता बिस्वा यांच्या पत्नी आहेत.
सर्मांची पत्नी रिनिकी (Riniki Bhuyan) भुइयां म्हणाल्या की, कॉलेजच्या काळापासून मुख्यमंत्री होण्याचा त्यांच्या पतीचा विश्वास होता. त्यांनी सांगितले की, विद्यार्थी असल्यापासूनच हिमंता त्याच्या ध्येयाबद्दल एकनिष्ठ होते आणि भविष्यात आपल्याला काय बनवायचे हे त्यांनी आधिच ठरवून ठेवले होते.
सर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी सोमवारी आसामच्या 15 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रिनिकी यांनी सांगितले की, "हिमंता 22 वर्षांचे होते आणि मी 17 वर्षांची होती जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो. मी त्यांना विचारले की, मी आईला आपल्या भविष्याबद्दल काय सांगू? तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, त्यांना सांगा मी आसामचा मुख्यमंत्री होईन."
रिनिकी (Riniki Bhuyan) यांनी सांगितले की, त्यांना हे ऐकून धक्का बसला, परंतु नंतर त्यांना हे कळले की, त्या ज्या व्यक्तीसोबत लग्न करणार आहेत, त्यांचे आपल्या राज्याला घेऊन एक निश्चित ध्येय आहे आणि ते राज्याबद्दल स्वप्न पाहत आहे.
रिनिकी (Riniki Bhuyan) म्हणाल्या, "आम्ही जेव्हा लग्न केले तेव्हा हिमंता आमदार होते, त्यानंतर ते मंत्री झाले आणि त्यानंतर राजकारणात ते पुढे जात राहिले, परंतु आज ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत, हे पाहून माझा विश्वासच बसत नाही."
रिनिकी (Riniki Bhuyan) म्हणाल्या की, "काल रात्रीही आमची चर्चा झाली, तेव्हा त्यांनी निर्देशित मुख्यमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख केला, तेव्हा मी त्यांना विचारले 'कुण' (कोण) तेव्हा त्यांनी उत्तर दिले 'मुई' (मी). ते नेहमीच माझ्यासाठी हिमंता राहिले आहेत आणि आता मला मुख्यमंत्री या शब्दाशी परिचित होण्यासाठी थोडा वेळ लागेल." सर्माची पत्नी मीडिया उद्योजक आहे. या जोडप्याला दोन मुले आहेत. 19 वर्षीय नंदिल बिस्वा सर्मा आणि 17 वर्षांची सुकन्या सर्मा.