नवी दिल्ली : अयोध्या राम जन्मभूमी वादाची ११ ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनवाणी होणार आहे. यासाठी तीन न्यायमूर्तींचे कोर्ट असणार आहे. याबाबत संकेतस्थळावर एक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे.
याआधी २१ जुलैला सर्वोच्च न्यायालयाने याबाबत संकेत दिले होते. अयोध्यामधील वादग्रस्त ठिकाणची जागा वाटत करण्यासंबंधित अलाहाबाद उच्च न्यायालय आदेश दिले होते. याला आव्हान देण्याची याचिका करण्यात आली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती जगदीश सिंह केहर आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्राचूड म्हणाले, "आम्ही हा निर्णय घेऊ."
भारतीय जनता पार्टी (भाजप) राजस्थानचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी लवकरच सुनावणीची विनंती केली. गेल्या ७ वर्षांपासून ही सुनावणी प्रलंबित आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१०च्या आपल्या निर्णयामध्ये विवादीत स्थळ निर्मोही अखाडा, वक्फ बोर्ड आणि रामलला यांच्यात विभाजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.