VIDEO : पाठीवर बॅग, खांद्यावर हात आणि बहरणारं गुलाबी प्रेम; सायकलस्वारी करणारी जोडी पाहून आठवेल 90 दशकातील लव्ह स्टोरी

Couple Video : धुकाची चादर आणि त्यात गुलाबी प्रेम, सायकलस्वारी करणाऱ्या या प्रेमी युगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला 90 दशकातील लव्ह स्टोरी आठवेल.   

नेहा चौधरी | Updated: Dec 20, 2023, 04:01 PM IST
VIDEO : पाठीवर बॅग, खांद्यावर हात आणि बहरणारं गुलाबी प्रेम; सायकलस्वारी करणारी जोडी पाहून आठवेल 90 दशकातील लव्ह स्टोरी title=
bag on the back hand on the shoulder love story of the 90s will be remembered by seeing the cycling couple romance video viral trending today

Couple Viral Video : सोशली मीडियावर अनेक कपलचे व्हिडीओ पाहिला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही मजेशीर असतात. काही व्हिडीओ तर कपलच्या प्रेमाने बहरलेला असतो. या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे 2023 मध्ये धावत्या गाडीवर कपलचा रोमान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. बाइक, स्कूटर अगदी कारच्या रुफ टॉपवर रोमान्स करताना कपल दिसून आले. आता नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कपल सायकलवर प्रेम (Couple Romance On Cycle) करताना दिसत आहे. 

पाठीवर बॅग, खांद्यावर हात आणि बहरणारं गुलाबी प्रेम!

हिवाळ्यात गुलाबी थंडीचा आनंद घ्यायला प्रत्येकाला आवडतो. शहरी भागात फार थंडी नसते. पण ग्रामीण भागत हवा हवा असणारा गारवा आणि धुक्याची चादर...हे दृश्यं अगदी मनमोहक असतं. दाट धुक्यात सकाळ शाळा, कॉलेज अगदी कामावर जाणं कठीण होतं. धुक्याची पांढरीशुभ्र चादर आणि त्यात कपलची भेट...

सोशल मीडियावर ग्रामीण भागातील एका कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एक तरुण आणि तरुणी आपल्या आपल्या सायकलवर दाट धुक्यातून कुठे तरी जाताना दिसत आहे. त्यांच्या दोघांच्या पाठीवर बॅग आहे. कदाचित ते शाळा किंवा कॉलेजला जात आहेत, असं वाटतं. एकमेकांच्या आजूबाजूला सायकल चालवत जात असताना अचानक तरुण तरुणीच्या खांद्यावर हात टाकतो आणि तिला मिठी मारतो. त्यानंतर थोड्याच वेळाने तो तिच्या गालावर किस करतो. हे सर्व ते सायकल चालवत करत असतात. या व्हिडीओला 90 दशकातील गाणं लावलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून अनेकांना 90 दशकातील गुलाबी प्रेमाची कहाणी आठवतेय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @wtfpratyush

हा व्हिडीओ @wtfpratyush या सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत तुफान प्रतिसाद मिळाला आहे. यूजर्सने भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. तर नेटकरी वारंवार हा व्हिडीओ पाहत आहेत. मात्र काही नेटकरी या व्हिडीओवर निगेव्हिट टीकाही करत आहेत.