तुमची महत्त्वाची कामं आजच करा, जुलैमध्ये 14 दिवस बँका बंद

जुलै महिन्यात 14 दिवस बँका बंद, आजच चेक करा सुट्ट्यांची पूर्ण यादी

Updated: Jun 27, 2022, 11:36 AM IST
तुमची महत्त्वाची कामं आजच करा, जुलैमध्ये 14 दिवस बँका बंद title=

मुंबई : कोरोनानंतर अनेक जण ऑनलाइन व्यवहार करू लागले आहेत. मात्र अजूनही काहीजण बँकेवर डिपेंड आहेत. त्यांची महत्त्वाची कामं बँकेत होतात. या सगळ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमची बँकेतील कामं काही असतील तर ती आतापासून करायला लागा. जुलै महिन्यात 14 दिवस बँका बंद असणार आहेत. 

जुलै महिन्यात 14 दिवस बँक बंद राहणार आहे. देशातील वेगवेगळ्या राज्यात सणवारानुसार सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सुट्ट्याचं कॅलेंडर जाहीर केलं आहे. त्यामुळे कोणत्या कोणत्या दिवशी कुठे बँका बंद असणार जाणून घेऊया.

1 जुलै - कांग (रथजात्रा)/ रथ यात्रा- भुबनेश्वर आणि इंफळ बँक बंद
3 जुलै - रविवार 
7 जुलै - खर्ची पूजा- अगरतळा बँक बंद
9 जुलै - शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार), ईद-उल-अधा (बकरीद)
10 जुलै - रविवार 
11 जुलै - ईज-उल-अजा- जम्मू आणि श्रीनगर बँक बंद
13 जुलै - भानू जयंती- गंगटोक बँक बंद
14 जुलै - बेन डिएनखलाम- शिलाँग बँक बंद
16 जुलै- हरेला- देहरादून बँक बंद
17 जुलै - रविवार 
23 जुलै - शनिवार-  महिन्याच्या चौथा शनिवार असल्याने सुट्टी
24 जुलै - रविवार 
26 जुलै - केर पूजा- अगरतळा बँक बंद
31 जुलै - रविवार 

रिझव्ह बँक एक कॅलेंडर जारी करते. यामध्ये बँकेच्या सुट्ट्यांबद्दल महत्त्वपूर्ण माहिती असते. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक बंद राहणार आहे. तर रविवारी साप्तहिक सुट्टी म्हणून बँक बंद राहणार आहे. याशिवाय कोणत्या राज्यात कधी बँक बंद राहणार हे या कॅलेंडरमध्ये देण्यात आलं आहे.