Bank Holidays:सप्टेंबरचा अर्धा महिना तर सुट्ट्यांमध्येच, पाहा RBI ची संपूर्ण यादी

Bank Holidays September 2024: सप्टेंबरमध्ये 15 दिवसांच्या सुट्टीत राष्ट्रीय आणि स्थानिक सुट्ट्यांसोबत रविवार, दुसरा आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Aug 26, 2024, 12:34 PM IST
Bank Holidays:सप्टेंबरचा अर्धा महिना तर सुट्ट्यांमध्येच, पाहा RBI ची संपूर्ण यादी title=
सप्टेंबरचा अर्धा महिना बॅंकांना सुट्ट्या

Bank Holidays September 2024: सप्टेंबर महिना यायला आता काही दिवसच शिल्लक आहेत. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून बॅंकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आरबीआय बॅंक हॉलीडे कॅलेंडर 2024 नुसार, भारताच्या विविध राज्यांमध्ये, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रांमध्ये एकूण 15 दिवस बॅंक बंद राहणार आहेत. तुम्हाला बॅंकांशीसंबंधी काही काम असेल तर या सुट्ट्या लक्षात घेऊन करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सप्टेंबरमध्ये 15 दिवसांच्या सुट्टीत राष्ट्रीय आणि स्थानिक सुट्ट्यांसोबत रविवार, दुसरा आणि चौथ्या शनिवारचा समावेश आहे. 

बॅंक सुट्ट्यांची पूर्ण यादी 

1 सप्टेंबर रोजी बॅंकांना रविवारची सुट्टी असेल.4 सप्टेंबर रोजी तिरुभव तिथीची सुट्टी गुवाहटी येथे असेल. 7 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात गणेशोत्सवाची सुट्टी असेल. 8 सप्टेंबर रोजी रविवारची सुट्टी असेल.14 सप्टेंबर दुसरा शनिवार तसेच ओणमची सुट्टी कोची, रांची आणि तिरुवनंतरपुरम) येथे असेल. 15 सप्टेंबर रोजी रविवारची सुट्टी असेल.16 सप्टेंबर रोजी बारावफातची सुट्टी असेल. 17 सप्टेंबर रोजी मिलाद उन नबीची सुट्टी गंगटोक आणि रायपूरमध्ये असेल. 

18 सप्टेंबर रोजी पंग लहबसोलची सुट्टी गंगटोक येथे असेल. 20 सप्टेंबर रोजी इद ए मिलादची सुट्टी असेल. 22 सप्टेंबर रोजी रविवारची सुट्टी असेल. 21 सप्टेंबर रोजी श्री नारायण गुरु समाधी दिवसाची सुट्टी कोची आणि तिरुवनंतपुरम येथे असेल. 23 सप्टेंबर रोजी महाराजा हरिसंह यांच्या जन्मदिवसाची सुट्टी जम्मू आणि श्रीनगर येथील बॅंकांना असेल. 28 सप्टेंबर रोजी चौथ्या शनिवारची तर 29 सप्टेंबर रोजी  रविवारची सुट्टी बॅंकांना असेल. 

राज्यानुसार असतात बॅंकांच्या सुट्ट्या 

बॅंकांसाठी सर्व राज्यांच्या सुट्ट्यांची यादी एकसारखी नसते. भारतीय रिझर्व्ह बॅंकनुसार, सर्व राज्यांच्या सुट्ट्यांची यादी वेगळी असते. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर या संपूर्ण सुट्ट्यांची यादी देण्यात आली आहे. ज्यामध्ये राज्यांनुसार वेगवेगळ्या सुट्ट्यांचा आढावा घेण्यात आला आहे. 

ऑनलाइन होतील सारी कामे 

बॅंक बंद असल्या तरी ग्राहकांना कोणत्या अडचणी येणार नाहीत. सुट्ट्यांच्या दिवशीदेखील लोकं ऑनलाइन बॅंकींगच्या मदतीने सारी कामे करु शकतात. आजकाल बॅंकाची सर्व कामे ऑनलाइन होतात. त्यामुळे कॅश पाठवणे, बॅलेंन्स तपासणे अशी अनेक कामे तुम्ही घरबसल्या  ऑनलाइन माध्यमातून करु शकता.