बंगळुरूमध्ये इमारत ढासळली, अनेकजण दबल्याची भीती

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका इमारत पडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत अनेक लोक ढिगा-याखाली बदले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Updated: Feb 15, 2018, 09:14 PM IST
बंगळुरूमध्ये इमारत ढासळली, अनेकजण दबल्याची भीती title=

नवी दिल्ली : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका इमारत पडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत अनेक लोक ढिगा-याखाली बदले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घट्नास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून आत्तापर्यंत ३ लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. 

काय आहे स्थिती?

ही इमारत कसुवनाहल्लीच्या सारजापुर मार्गावर आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले आहेत. एनडीआरएफची टीमही लोकांना वाचवण्याचं काम करत आहेत. ढिगा-याखाली दबलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. आत्तापर्यंत ही इमारत पडण्याचे कारण कळू शकले नाहीयेत. मीडिया रिपोर्टनुसार, या इमारतीचं काम सुरू होतं. या दुर्घटनेत जखमी ७ लोकांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याआधीही घडली घटना

याआधी ऑक्टोबर २०१७ मध्ये बंगळुरूच्या इजीपुरा परीसरात एक इमारत पडल्याने ७ जणांना जीव गमवावा लागला होता. त्यावेळी एक एलपीजी सिलेंडर फुटल्याने ही इमारत पडल्याचे बोलले जात होते.