मुंबई: गेल्या काही दिवसांपासून वादात असलेल्या बंगळुरू प्रकरणानं वेगळंच वळण घेतलं आहे. Zomato कंपनीनं प्रसिद्धी पत्रक काढून या प्रकरणावर आपली बाजू मांडली आहे. डिलिव्हरी बॉयनं दिलेल्या प्रतिक्रियेनंतर या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं होतं. त्यानंतर कंपनीनं आपली भूमिका मांडल्यामुळे आता वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत.
महिलेला मारल्याचा आरोप स्वत: झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयनं फेटाळून लावला आहे. उलट त्या महिलेनंच आपल्याला मारहाण केल्याचं त्याचं म्हणणं आहे. या प्रकरणात आता झोमॅटो कंपनीनं निवेदन जारी केलं आहे. त्या निवेदनात झोमॅटोनं देखील डिलिव्हरी बॉयची बाजू घेतल्याचं दिसत आहे.
झोमॅटोचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनीही सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकरणाबाबत निवेदन जारी केले आहे. दीपेंद्र गोयल यांनी सांगितले की, हितेशाचा आणि डिलिव्हरी बॉय दोघांना जी वैद्यकीय मदत लागेल ती आम्ही करू. हिताशा आणि कामराज या दोघांच्याही संपर्कात आम्ही आहोत. आताच्या नियमांनुसार कामराजला निलंबित केलं आहे, जरी त्याचा कायदेशीर खर्च तो करत असला तरी कामराजने कंपनीकडून 2 महिन्यात 5 हजारहून अधिक डिलिव्हरी केल्या आहेत. इतकच नाही तर त्यांना 4.57 रेटिंग्स मिळाले आहेत. या प्रकरणातील सत्य जाणून घेण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे दीपेंद्र यांनी सांगितले.
I want to chime in about the incident that happened in Bengaluru a few days ago. @zomato pic.twitter.com/8mM9prpMsx
— Deepinder Goyal (@deepigoyal) March 12, 2021
'द न्यूज मिनिट' शी बोलताना कामराज नावाच्या डिलिव्हरी मुलाने सांगितले की, 'मी त्याच्या अपार्टमेंटच्या दाराजवळ पोहोचलो आणि त्यांना जेवण दिलं. त्याने कॅश ऑन डिलिव्हरी पेमेंट पर्यायाची निवड केली केली होती. मी त्यांना या संदर्भात बोललो, वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यांमुळे येण्यासाठी उशीर झाल्यानं मी त्यांची क्षमा मागितली. या महिलेचं वागण खूप वाईट होतं. त्यांनी जोरजोरात माझ्यावर ओरडायला सुरुवात केली.
ऑर्डर कॅन्सल झाल्याची माहिती मला मिळाल्यानंतर मी त्यांना जेवणं पुन्हा मला परत द्या असं सांगितलं. ऑर्डर तुम्ही कॅन्सल केली आहे त्यामुळे मला ती परत द्या अशी विनंती केली. त्यावर महिलेनं मला पैसेही दिले नाहीत आणि ऑर्डरही परत केली नाही. याउलट आरडाओरडा करत माझ्यावर आरोप केले.