close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भय्यूजी महाराजांवर येथे होणार अंत्यसंस्कार....

प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज त्यांच्या आत्महत्येची पोलिसांनी चौकशी सुरू...

Updated: Jun 13, 2018, 07:55 AM IST
भय्यूजी महाराजांवर येथे होणार अंत्यसंस्कार....

मुंबई : प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांच्यावर बुधवारी दुपारी १ वाजता इंदूरमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत इंदूरच्या सूर्योदय आश्रमात त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर आज रात्री त्यांचं पार्थिव इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. भय्यूजी महाराज यांनी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. बंद खोलीत उजव्या कानशिलात त्यांनी स्वतःवर गोळी झाडली. तणावातून भय्यू महाराजांनी मृत्यूला कवटाळल्याचं त्यांच्या सुसाईड नोटमधून पुढं आलंय. स्वत:वर गोळी झाडून घेतल्यानंतर त्यांना तातडीनं इंदूरच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनानं दिलीय. त्यांच्या आत्महत्येची पोलिसांनी चौकशी सुरू केलीय.