नवी दिल्ली : गुजरात दौर्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या गावी, वडनगर येथे रोड शो केला. वडनगरमधील वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटनही त्यांनी केले. यानंतर ते भरूच येथे पोहोचले आणि नर्मदा नदीवर उभारलेल्या बंदराच्या पायथ्याचा शिलान्यास केला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांनी अंत्योदय एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. सुरतच्या उधानापासून बिहारच्या जयनगरपर्यंत प्रवाशांसाठी हे अंत्योदय एक्स्प्रेस चालविली जात आहे.
युरिया विकत घेण्यासाठी शेतकर्यांना आज रांगेत उभे रहावे लागत आहे. परंतु यापुढे शेतकऱ्यांना युरिया विकत घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज लागणार नाही. तसेच युरियासाठी लाठीचार्जही खावा लागणार नाही.
#WATCH: PM Modi says, 'desh ko lootne wale kitne bhi ikathhe ho jaayein imaandari hi jeetegi' pic.twitter.com/TtPpc6pScw
— ANI (@ANI) October 8, 2017
कारण कडुनिंबाचे कोटिंग झाल्याने युरियाची चोरी आता थांबली असून चोर-दरोडेखोर माझ्या विरोधात उभे असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, मी गांधी आणि सरदार यांच्या मातीत मोठे झालो. देशाला लुटणारे कितीही एकत्र झाले तरीही प्रामाणिकपणा कधीही हरु शकत नाही. आम्ही हा विश्वास घेवून चालणारी माणसं आहोत. आम्ही पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या स्वप्नांना पूर्ण करू. देशातील पहिला पशु आरोग्य मेळावा उत्तर प्रदेशमध्ये झालाआहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नर्मदा नदीवर उभारलेल्या एका बंदराच्या पायथ्याची पायाभरणी केली.
Bharuch, Gujarat: PM Modi lays foundation stone of a barrage over Narmada River. pic.twitter.com/Ip4aCT1VTf
— ANI (@ANI) October 8, 2017
तत्पूर्वी पंतप्रधान मोदी वायु सेना विमानातून वडनगरमध्ये उतरले. यानंतर होकारेश्वर मंदिरपर्यंतचे पाच किलोमीटरचे अंतर त्यांनी रोड शो केला. या मार्गावर मोदींच्या जीवनाशी जोडलेल्या छायाचित्रे लावण्यात आली आहेत. जिथून पंतप्रधानांचा ताफा गेला तिथे लोकांचा गराडा पाहायला मिळत होता. वाडवनाच्या लोकांनी गुलाबच्या फुलांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
पंतप्रधानांची संपूर्ण कार फुलांनी झाकली गेली.
Bharuch: PM Modi flags of Antyodaya Express between Udhna in Surat and Jaynagar in Bihar. (Visual of Antyodaya Express from Surat) pic.twitter.com/6qFxIPyvKg
— ANI (@ANI) October 8, 2017
पीएमची रॉड शो बीएन हायस्कूलपासून सुरू होऊन होकारेश्वर मंदिरापर्यंत संपला. या मंदिरामध्ये मोदींनी भगवान शिव यांची पूजा केली. यानंतर पंतप्रधानांनी मेडिकल कॉलेजचे उद्घाटन केले. त्यानंतर, मोदींनी वडनगरमध्ये 'मिशन इंद्रधनुष्य' ला सुरू केली. तसेच जनसभेला संबोधित केले.