गूगलची चूक काढली आणि त्या बदल्यात या मुलाला ही ऑफर मिळाली...पाहा

कोणीही परिपूर्ण नसतच, प्रत्येकामध्ये काही ना काही उणीव असतेच मग तो गूगल (Google) का असेना.   

Updated: Feb 2, 2022, 03:13 PM IST
गूगलची चूक काढली आणि त्या बदल्यात या मुलाला ही ऑफर मिळाली...पाहा title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : कोणीही परिपूर्ण नसतच, प्रत्येकामध्ये काही ना काही उणीव असतेच मग तो गूगल (Google) का असेना. आपण अडचणीत असलो की सर्वात आधी आपण कोणत्याही माहितीसाठी गूगल करतो. पण या गूगलबाबामध्येही उणीव असतातच हे पुन्हा एकदा उघड झालं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने गूगलमध्ये असलेला (Google Bug) बग शोधून काढला आहे. यानंतर गूगलनेही थेट या विद्यार्थ्याची रिसर्चरपदाची जबाबदारीही दिली. (bihar begusarai btech 2nd year student ruturaj chaudhari caught bug in google)  
 
बिहारमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या ऋतुराजने ही कमाल केली आहे. ऋतुराजने गूगलची एक साईट हॅक केली तसेच याची सूचनाही गूगलला दिली. यानंतर गूगलनेही मान्य केलं की आपली वेबसाईटही हॅक होऊ शकते. यानंतर गूगलने ऋतुराजची गुणवत्ता पाहता त्याला आपल्या टीममध्ये रिसर्चर म्हणून समावेश केला.   

बिहारमधील बेगूसराययेथील मुंगेरीगंजमध्ये राहणाऱ्या सराफा व्यवसायिक राकेश चौधरी यांचा मुलगा मणिपूरमध्ये बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. 

ऋतुराजने सांगितलं की "मला लहानपणापासूनच हॅकर बनायचं होतं. त्यानुसार मी वाटचाल केली. अनेक कंपन्यांच्या साईटमध्ये असलेल्या उणिवा शोधण्याचं प्रयत्न करत होतो. अखेर मला गूगलच्या एका साईटमध्ये एक मोठी चूक निदर्शनास आली. ही उणीव इतकी मोठी होती की ज्यामुळे साईट हॅक ही करता आली असती".    
 
...आणि रिसर्चरपदी निवड

ऋतुराज म्हणाला की, "मला या बगबाबत समजलं तसंच मी तडक गूगलला मेलद्वारे कळवलं. यानंतर गूगलकडून एक दिवसानंतर मेलला उत्तर आलं. तुम्ही सांगितलेली चूक अगदी बरोबर आहे. चूक सूधारण्यासाठी संपूर्ण टीम कामाला लागली. सोबत ऋतुराजचीही मदत व्हावी यासाठी त्याच्याही समावेश करण्यात आला. 

कुटुंबियांची प्रतिक्रिया 

गूगल त्यांच्या वेबसाईटमध्ये चूक शोधून काढणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला बक्षिस म्हणून मोठी रक्कम देते. त्यामुळे गूगलकडून ऋतुराजला बक्षिस स्वरुपात काय दिलं जातं याकडे आयटी क्षेत्राचं लक्ष असणार आहे. दरम्यान ऋतुराजला रिसर्चर म्हणून आपल्या टीममध्ये समाविष्ठ करुन घेतलं आहे. 

ऋतुराजने मिळवलेल्या या यशाबाबत त्याचे कुटुंबिय आणि शेजारी फार आनंदी आहेत. "हॅकर 2 प्रकारचे असतात, एक चांगले आणि एक वाईट. माझा मुलगा पहिल्या प्रकारातला आहे जो साईटमधील उणिवा शोधून ते समोर आणतो. ज्यामुळे अपप्रवृत्ती गैरफायदा घेऊ शकत नाही", अशी प्रतिक्रिया ऋतुराजच्या वडिलांनी दिली.