या पक्षाचा आवाज ऐकून तुम्हाला एक क्षण वाटेल बाळच रडतंय... व्हिडीओ

नक्की कोण रडतंय बाळ की पक्षी व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा

Updated: Sep 5, 2021, 05:07 PM IST
या पक्षाचा आवाज ऐकून तुम्हाला एक क्षण वाटेल बाळच रडतंय... व्हिडीओ title=

नवी दिल्ली: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही हसवणारे तर काही थक्क करणारे व्हिडीओ असतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण हैराण झाले आहेत. तर काही युझर्सही फसले आहेत. या व्हिडीओमध्ये पक्षी रडत असल्याचं दिसत आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पक्षी रडत आहे. पण त्याच्या रडण्याचा आवाज हा बाळाच्या रडण्याच्या आवाजासारखा येत आहे. त्यामुळे नेमकं रडतंय कोण पक्षी की बाळ असा प्रश्न अनेक युझर्सना पडला आहे. हा पक्षी लहान मुलांसारखं रडत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओची चर्चा होत आहे. 

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना विश्वासच बसत नव्हता तर काहीजण हा व्हिडीओ एडिटेड असावा असाही अंदाज व्यक्त करत आहेत. 633.6 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. टॅरोन्गो जू नावाच्या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

(सूचना- हा व्हिडीओ व्हायरल आहे झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही.)