नवी दिल्ली : भाजपच्या विस्तारित कार्यसमितीची बैठकीला दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये सुरुवात झालीय. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळे बडे नेते या बैठकीत हजर आहेत.
या बैठकीला साधारणपणे दोन हजार सदस्य उपस्थित आहेत. त्यात भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, आमदार, खासदारांचे समावेश आहे. पुढच्या दीड वर्षात पक्षाची वाटचाल कशी असेल याविषयी बैठकीत मंथन होणार आहे.
आज पंडित दिन दयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होतेय. त्यामुळे बैठकीत अंत्योदय के पथपर संकल्प से सिद्धि तक! अशी या बैठकीची संकल्पना आहे.
राजकीय आणि आर्थिक विषय़ांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. रोहिंग्यांना देशात प्रवेश द्यायला सरकारनं विरोध दर्शवलाय. या निर्णयाला समर्थन देण्याचा प्रस्ताव या बैठकीत येऊ शकतो.