'भाजप म्हणजे पडद्यामागे सिगारेट ओढणारी सीता'

भारतीय जनता पक्षात सर्व कर्म-कुकर्म होत असते.

Updated: Apr 25, 2019, 08:21 PM IST
'भाजप म्हणजे पडद्यामागे सिगारेट ओढणारी सीता' title=

पाटणा: भाजप पक्ष म्हणजे पडद्यामागे सिगारेट ओढणाऱ्या सीतेप्रमाणे असल्याचे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय लोक समता पार्टीचे (आरएलएसपी) अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी केले आहे. ते गुरुवारी बिहारच्या दरभंगा येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, तुम्ही रामलीला पाहिली असेल तर त्यामध्ये सीतेचा वेश परिधान केलेली व्यक्ती असते. ही व्यक्ती स्टेजवर आल्यानंतर रामलीला पाहणारे लोक तिच्यासमोर श्रद्धेने नतमस्तक होतात. मात्र, जेव्हा रामलीला संपल्यानंतर तुम्ही पडद्यामागे जाऊन पाहिलेत तर हीच सीता तुम्हाला सिगारेट ओढताना दिसेल. भाजपचा खरा चेहराही असाच आहे, अशी टीका कुशवाह यांनी केली. 

मी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (एनडीए) असताना हे सर्व जवळून पाहिले आहे. इतकी वर्षे सारे बाहेरून पाहत होतो. आता मात्र थेट आत जाऊनच पाहून आलो. यांच्या आत काय आहे, बाहेर काय आहे हे पाहिले आहे. भारतीय जनता पक्षात सर्व कर्म-कुकर्म होत असते. बाहेर मात्र देव-देवतांचे रूप असते. देवीचे रुप जनतेच्या समोर मंचावर असते, आणि सिगारेटवाले रूप मी आत पाहून आल्याचेही कुशवाह यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून उपेंद्र कुशवाह भाजपवर नाराज झाले होते. यानंतर केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा देत कुशवाह बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीत सामील झाले होते.