भाजप नेत्याने 'या' शुल्लक कारणावरून केली पत्नीची हत्या, आणि...

भाजप नेत्याने शुल्लक कारणावरून पत्नीची गोळ्य़ा झाडून हत्या केल्य़ाची घटना समोर आली आहे.

Updated: Jun 16, 2022, 09:13 PM IST
भाजप नेत्याने 'या' शुल्लक कारणावरून केली पत्नीची हत्या, आणि... title=

बिहार : बिहारमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजप नेत्याने शुल्लक कारणावरून पत्नीची गोळ्य़ा झाडून हत्या केल्य़ाची घटना समोर आली आहे. पत्नीच्या हत्येनंतर भाजप नेत्यानेही स्वत:ही आत्महत्या केली. या घटनेने बिहारच्या राजकारणार मोठी खळबळ माजली आहे. 

बिहारमधील मुंगेर येथील भाजप नेते अरुण यादव यांनी त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रीती कुमारी असे त्यांच्या पत्नीचे नाव होते. प्रीती कुमारी या महापौरपदाच्या उमेदवार होत्या.

प्रीती कुमारी यांनी महापौरपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराला जाण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्दयावरून दोघांमध्ये वादही झाले होते. या वादात अरुण यादव यांनी त्यांच्य़ा पत्नीची  हत्या केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.  

दरम्यान पत्नीच्या हत्येनंतर अरुण यादव यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. राजकीय वर्तुळात देखील या घटनेचा शोक व्यक्त होत आहे. 

सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दोन देशी बनावटीची पिस्तुले जप्त केली आहेत. या प्रकरणाचा तपास सुरु आहे.