कोरोनामुळे भाजप खासदाराचं निधन

भाजपचे (BJP) खासदार नंदकुमारसिंह चौहान (nandkumar singh chauhan) यांचे निधन झाले. 

Updated: Mar 2, 2021, 03:31 PM IST
कोरोनामुळे भाजप खासदाराचं निधन title=
संग्रहित छाया

मुंबई : भाजपचे (BJP) खासदार नंदकुमारसिंह चौहान (nandkumar singh chauhan) यांचे निधन झाले. चौहान हे दिर्घकाळ आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचार सुरु होते. त्याचवेळी ते कोरोना संक्रमित झाले होते. सोमवारी रात्री उशिरा त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते मध्य प्रदेशातील खंडवा येथील लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.

नंदकुमारसिंह चौहान यांच्यावर एक महिन्यापासून दिल्लीत उपचार सुरू होते. 11 जानेवारी रोजी कोरोनाव्हायरसची लागण झाल्यानंतर त्यांना भोपाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु अधिक गंभीर परिस्थितीमुळे त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले.

मोदी यांनी व्यक्त केले दुःख 

पंतप्रधान नरेंद्र मोदी ( (Narendra Modi)) यांनी नंदकुमारसिंह चौहान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ट्विट केले की, 'खंडवाचे लोकसभा खासदार नंदकुमारसिंह चौहान जी यांच्या निधनामुळे मी दु: खी आहे. संसदीय कार्यवाही, संघटनात्मक कौशल्य आणि मध्य प्रदेशात भाजपाला बळकटी देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांचे स्मरण केले जाईल. कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. ओम शांती. '

शिवराजसिंह चौहान यांच्याकडून शोक

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी नंदकुमारसिंह चौहान यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, 'लोकप्रिय सार्वजनिक नेते नंदू भैय्या, आम्ही सर्वांना सोडून निघून गेले. आमचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. नंदू भैया यांच्या रूपाने भाजपने एक आदर्श कार्यकर्ता, कुशल संघटक, सार्वजनिक नेता गमावला. मी दु: खी आहे. नंदू भैययाचे निघणे हे माझे वैयक्तिक नुकसान आहे.

नंदकुमारसिंह चौहान यांची राजकीय कारकीर्द

नंदकुमारसिंह चौहान यांचा जन्म 8 सप्टेंबर 1952 रोजी मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील शाहपूर येथे झाला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नंदकुमार चौहान यांनी 1985 ते 1996 या काळात दोनदा बुरहानपूर विधानसभेची जागा जिंकली. यानंतर ते 1996 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना खंडवा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या मतदारसंघातून ते विजयी झाले. तथापि, अटलबिहारी वाजपेयी यांनी राजीनामा दिल्यानंतर 1997 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपला. यानंतर 1998च्या पोटनिवडणुकीत नंदकुमार चौहान यांनी दुसर्‍यांदा खंडवा जागा जिंकली. 1998-99 पर्यंत त्यांचा कार्यकाल राहिला.

1999 मध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपने पुन्हा नंदकुमार चौहान यांना खंडवामधून उमेदवारी दिली. ते तिसऱ्यांदा विजयी झाले. 5 वर्षांची मुदत पूर्ण केली. यानंतर नंदकुमार चौहान यांनीदेखील 2004 ची निवडणूक जिंकून लोकसभेत पोहोचले होते, 2009 च्या निवडणुकीत त्यांना खंडवा सीटवरील काँग्रेसचे उमेदवार अरुण यादव यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर, त्यानी 2014 आणि 2019 मध्ये सलग विजय नोंदवले. यावेळी ते दोन वेळा मध्य प्रदेश भाजपचे अध्यक्षही होते.