युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री पदावर अमित शाह यांचे भाष्य

शिवसेनेशी युती तुटल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.  

Updated: Nov 13, 2019, 07:29 PM IST
युती तुटल्यानंतर मुख्यमंत्री पदावर अमित शाह यांचे भाष्य title=
संग्रहित छाया

मुंबई : शिवसेनेशी युती तुटल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे आम्ही स्पष्ट केले होते. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी संकेत दिले. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी अनेकदा जाहीरपणे सांगितले की जर आमची युती जिंकली तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील, त्यावेळी कोणालाही आक्षेप नव्हता. आता त्या नवीन मागण्या घेऊन आल्या आहेत ज्या आम्हाला मान्य नाहीत, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता खोटे कोण बोलत आहे, याबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर अमित शाह यांनी भाष्य करत शिवसेनेला खोटे ठरविले आहे. महायुतीचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असे निवडणुकीपूर्वीच सांगण्यात आले आहे. मात्र निवडणूक निकालानंतर शिवसेना नव्या मागण्या घेऊन समोर आली, असा आरोप अमित शाह यांनी केला. ५० - ५० सत्तेत वाटा हवा अशी मागणी होती. तशी चर्चा झाली होती, असे  शिवसेनेने जाहीरपणे सांगितले. मात्र, अमित शाह यांनी बैठकीत काय चर्चा झाली ते सांगण्याचे टाळले. शिसेनेसोबत मुख्यमंत्रीपद वाटून घेऊ असे काहीही ठरलेले नव्हते असेही अमित शाह यांनी स्पष्ट केले. पुढचे मुख्यमंत्री फडणवीसच असतील हे निवडणुकीच्या आधीच स्पष्ट झाले असे ते म्हणालेत.

सत्ता स्थापन करण्याबाबत ते म्हणालेत, विरोधक राज्यपालांनी वेळ दिला नाही हे विरोधकांचे म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी तयार होतो. मात्र त्यांनी साथ सोडली. महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील हे मी भाषणांमध्ये अनेकदा बोललो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा त्यांच्या सभांमधून हेच सांगितले. असे असताना निवडणूक निकाल लागल्यानंतर शिवसेनेने अटी बदलल्या. त्यांच्या नव्या अटी आम्हाला मान्य नाहीत असे अमित शाह म्हणालेत.

पाहा अमित शाह काय म्हणालेत?