नितीश कुमार यांना भाजपचा पाठिंबा

बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत.

Updated: Jul 26, 2017, 09:38 PM IST
नितीश कुमार यांना भाजपचा पाठिंबा  title=

पाटणा : बिहारमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप आता नितीश कुमार यांच्या मदतीला धावली आहे. बिहारमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी नितीश कुमार दावा करणार आहेत. नितीश कुमार यांच्या या सरकारमध्ये भाजपही सहभागी होणार आहे. बिहारचे भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी नितीश कुमार यांना पाठिंबा दिला असल्याची माहिती दिली आहे. नितीश कुमार हे उद्याच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेत मॅजिक फिगर म्हणून १२२ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे.  सध्या लालूंच्या राजदचे ८०, काँग्रेस २७, जेडीयूचे ७१ आणि भाजपचे ५३ आमदार आहेत. तसेच इतर चार आमदार आहे. भाजपसोबत गेल्यास जेडीयू ७१, भाजप ५३ आणि ४ अपक्ष असे मिळून १२८ आमदार होत आहेत. यामुळे बिहारमध्ये मॅजिक फिगरचा आकडा नितीश अगदी सहज पार करत आहेत.