नवी दिल्ली : भाजपाची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. बिहारमध्ये भाजपाने ४० लोकसभा जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत नवीन नावे सामिल करण्यात आली असून अनेक जागांवर उमेदवार बदलण्यात आले आहेत. या यादीतून शत्रुघ्न सिन्हा यांचे लोकसभा २०१९ निवडणूकीसाठीचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपप्रणीत आघाडीने भाजपा, जदयू आणि एलजेपीच्या प्रदेशाध्यक्षांनी एकत्र उमेदवारांची यादी जाहीर केली .
भाजपाच्या तिसऱ्या यादीत गिरिराज सिंह यांना बेगूसराय येथून तर पाटनातील साहिब येथून रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जमुई येथून चिराग पासवान, रामकृपाल यादव यांना पाटीलपुत्र, राधा मोहन सिंह पूर्व चंपारण, राजीव प्रताप दुबे यांना सारण येथून उमेदवारी देऊन रिंगणात उतरवण्यात आले आहे.
रविशंकर प्रसाद यांनी पाटणाशी भावनिकदृष्ट्या जोडलो गेलो आहे. लोकसभेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी दिल्याने रविशंकर प्रसाद यांनी पक्षाचे, पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले आहे.
RS Prasad on being given BJP’s Lok Sabha ticket from Patna Sahib: Patna is my city, I was born there, studied there, became a lawyer.Even though I had been working on national level,I've an emotional connection with Patna. I'm grateful to the party, PM Modi, Amit Shah Ji & others pic.twitter.com/gmBlyXD3k9
— ANI (@ANI) March 23, 2019
शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षातून बडतर्फ करण्याची मागणी गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. शत्रुघ्न सिन्हा पंतप्रधान मोदींवर, सरकारच्या धोरणांवर नेहमीच उघडपणे चर्चा करतात. त्यामुळे त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याचे बोलले जात आहे.
बिहारमधील भाजपप्रणीत महाआघाडीने लोकसभेच्या ४० जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. गया, जमुई, नवादा आणि औरंगाबाद या जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल रोजी होणार आहे.