VIDEO : इशा अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात बी- टाऊन कलाकारांचा दणका

अमेरिकन गायिका बेयॉन्सेच्या गाण्यांवरही पाहुण्यांनी धरला ठेका   

Updated: Dec 10, 2018, 08:17 AM IST
VIDEO : इशा अंबानीच्या प्री-वेडिंग सोहळ्यात बी- टाऊन कलाकारांचा दणका   title=

मुंबई :  उद्योगविश्वातील एक प्रसिद्ध आणि प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियायन्स उद्योगह समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या घरी सध्या लग्नसराईची लगबग पाहायला मिळत आहे. अंबानी यांची मुलगी इशा हिच्या प्री- वेडिंग कार्यक्रमांना मोठ्या दणक्यात सुरुवात झाली आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणात साऱ्या जगाचं लक्ष वेधणाऱ्या हिलरी क्लिंटन म्हणू नका किंवा मग लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली अमेरिकन गायिका बेसॉन्से म्हणू नका. प्रत्येक प्रसिद्ध चेहऱ्याने उदयपूरमध्ये पार पडलेल्या इशाच्या प्री- वेडिंग सोहळ्याला हजेरी लावत त्याची रंगत वाढवल्याचं पाहायला मिळालं. 

बॉलिवूडचा किंग, अभिनेता शाहरुख खान याने त्याची पत्नी गौरी हिच्यासोबत ठेका धरला, तर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनीही सुरेख नृत्य करत सर्वांचच लक्ष वेधलं. परफेक्शनिस्ट आमिर खानचीही या सोहळ्याला उपस्थिती पाहायला मिळाली. 

डोळ्यांचं पारणं फेडणारी आकर्षक रोषणाई आणि बॉलिवूडमधील काही लोकप्रिय गाणी यांमुळे इशाच्या प्री- वेडिंग सोहळ्याची रंगत आणखीनच वाढली. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये फक्त बी- टाऊन कलाकार आणि बेयॉन्सेच नव्हे तर, खुद्द मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनीही  ठेका धरल्याचं पाहायला मिळत आहे. 

१२ डिसेंबरला इशा अंबानी आणि आनंद पिरामल विवाहबद्ध होणार आहेत. उद्योग विश्वासह सध्या संपूर्ण कलाविश्वाचं आणि साऱ्या देशाचच लग्न अंबानींच्या लाडक्या लेकीच्या विवाहसोहळ्याकडे लागलेलं आहे.