मोठी बातमी | सरकारी दुकानांमधील तुमचं राशन बंद? वितरण व्यवस्थेचे पुनर्विलोकन होणार

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विभागाच्यावतीने राशन दुकानदारांकडून घेणाऱ्या पात्र लोकांच्या मानकांमध्ये बदल करण्यात येणार आहे.

Updated: Jul 6, 2021, 07:51 PM IST
मोठी बातमी | सरकारी दुकानांमधील तुमचं राशन बंद? वितरण व्यवस्थेचे पुनर्विलोकन होणार title=

नवी दिल्ली : अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विभागाच्यावतीने राशन दुकानदारांकडून घेणाऱ्या पात्र लोकांच्या मानकांमध्ये बदल करण्यात येणार आहे. या संबधी राज्यांसोबत अनेक बैठका झाल्या आहेत. मानकं बदलण्याचे प्रारुपदेखील ठरले आहे. आशा आहे की, या महिन्यात बदललेले मानकं लागू होतील. ज्या आधारे भविष्यातील पात्रता ठरवली जाईल.

संपन्न लोक लाभ घेताहेत
विभागाच्या मते, सध्या देशातील 80 कोटी लोक अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत. यातील असंख्य लोक असे आहेत, की जे आर्थिक दृष्ट्या संपन्न आहेत. यामुळे राशन वितरण व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.

बदल का होताहेत?
अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशु पांडेय यांनी म्हटले की, मानकांमधील बदलांबाबत मागील 6 महिन्यांपासून राज्यांसोबत बैठक घेतली गेली आहे. राज्यांद्वारे आलेल्या सूचना सामिल करून पात्र लोकांसाठी काय मानकं असावीत हे ठरवण्यात येणार आहे. नवीन मानकं लागू झाल्यानंतर फक्त पात्र लोकांनाच राशनचा लाभ घेता येईल. खरोखर गरजू व्यक्तींना राशन मिळावं यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.