Bride Groom Private Video Play on Wedding Day : लग्न, लग्नातील विधी, लग्नाशी संबंधित प्रत्येक गोष्टी प्रत्येक क्षण हा नवरदेव नवरीसाठी खूप अनमोल आणि खास असतो. लग्नातील पोषाखापासून ते लग्नातील एन्ट्रीपर्यंत प्रत्येक गोष्ट हटके करण्यावर जोडप्यांचा कल असतो. नवरदेव असो किंवा नवरी डान्स करत लग्न मंडपात जोरदार एन्ट्री हे ठरलं आहे.
सोशल मीडियावर लग्नाचे आणि वधूवराचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असता. गेल्या काही वर्षांपासून प्री वेडिंगचा ट्रेंड आला आहे. नवरदेव नवरी निसर्गात जाऊन फोटोशूट करतात आणि मग हा खास प्री वेडिंगचा व्हिडीओ लग्नाच्या दिवशी मंडपात लावण्यात येतो. पण या प्री वेडिंग व्हिडीओमुळे एका नवरदेव नवरीवर मान शरमेने खाली घालण्याची वेळ आली.
झालं असं की, लग्ना मंडपात दोन्ही बाजूच्या वऱ्हाड्यांची रेलचेल दिसत आहे. वधू वराचे लग्नाचे विधी झाल्यानंतर सभागृहातील एका मोठ्या स्क्रिनवर प्री - वेडिंग दाखवण्यासाठी तो प्ले करण्यात आला...पण पुढच्या क्षणी नवरदेव नवरीवर मान खाली घालण्याची वेळी आली. कारण प्री वेडिंग व्हिडीओ सुरु होण्याऐवजी त्यांचा खाजगी क्षण प्ले झाला अन् मग...
या व्हिडीओमध्ये नवरदेव नवरी एकमेकांना मिठी मारताना आणि किस करताना दिसत आहे. त्यांचा हा रोमान्सचा क्षण भरमंडपात लागला आणि सगळ्यांना धक्का बसला. एवढंच नाही तर हा व्हिडीओ सुरु होतातच, अनेकांनी आपल्या मोबाईलवर हा क्षण कैद करायला सुरुवात केली. हे पाहून नवरदेवाने डोळे बंद केले तर नवरीला तर काही कळतंच नव्हतं काय करावं ते. त्या क्षणी ती स्तब्ध होऊन गेली.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओवर वेगवेगळ्या कंमेट्स येतं आहेत. कोणी त्यांची मनस्थिती समजून घ्या म्हणत आहेत, तर काही जण त्यांची मजा घेत आहेत. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर काढून टाकण्यात आला आहे.