अर्थसंकल्प २०१८ : पहिल्यांदाच हिंदीत भाषण, विचारा तुमचे प्रश्न

  अर्थसंकल्पाचे भाषण पहिल्यांदाच हिंदीतून होणार आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Feb 1, 2018, 09:14 AM IST
  अर्थसंकल्प २०१८ : पहिल्यांदाच हिंदीत भाषण, विचारा तुमचे प्रश्न  title=

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्प आज सकाळी ११ वाजता संसदेत मांडला जाणार आहे. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर परिणाम झाल्याने अर्थमंत्री अरूण जेटलींकडे यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

सकाळी ११ वाजता अर्थमंत्र्यांच्या भाषणाला सुरूवात होणार आहे.

हिंदीतून भाषण 

दरम्यान अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळत आहे.

अर्थसंकल्पाचे भाषण पहिल्यांदाच हिंदीतून होणार आहे.

प्रश्न विचारा  

आपल्या मनात अर्थसंकल्पासंबंधित कोणतेही प्रश्न असल्यास #AskYourFM हा हॅश टॅग वापरून मांडू शकता. सा. ७ वाजता अर्थमंत्री प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार आहेत.