ITR Filing | कर भरण्याइतपत कमाई नसेल तरीही फाइल करायला हवा ITR; जाणून घ्या फायदे

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये इनकम टॅक्स (Income Tax) भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. 

Updated: Aug 19, 2021, 02:08 PM IST
ITR Filing | कर भरण्याइतपत कमाई नसेल तरीही फाइल करायला हवा ITR; जाणून घ्या फायदे title=

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये इनकम टॅक्स (Income Tax) भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2021 आहे. 60 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे. त्यांना इनकम टॅक्समधून सूट मिळते. कोणतीही व्यक्तीची एकूण कमाई टॅक्स सूट मिळण्याच्या सीमेपेक्षा जास्त असते त्यांना इनकम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करावा लागतो. 

आपल्याला माहितीच आहे की, 60 वर्षावरील आणि 80 वर्षाहून कमी वय असलेल्या सीनिअर सिटीजनला टॅक्समधून सूट मिळण्याची सीमा 3 लाख रूपये आहे. सुपर सीनिअर सिटीजन म्हणजेच 80 वर्षाहून अधिकांसाठी ही सीमा 5 लाख रुपये आहे.

जर तुमचा पगार इनकम टॅक्स सीमेपेक्षा कमी असेल तरी तुम्हाला इनकम टॅक्स रिटर्न दाखल करणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक फायदे मिळतात.

1 लोनची योग्यता निश्चित होते
जर तुम्ही कोणतेही लोन घेण्यास इच्छुक असाल तर बँक तुमची योग्यतेची पडताळणी करते. जी योग्यता उत्पन्नाच्या आधारे निश्चित केली जाते. बँक तुम्ही ITR काय फाइल केला आहे. त्यानुसार लोन देते.ITR असे डॉक्युमेंट आहे की, जे बँक लोनच्या प्रोसेसिंगसाठी वापरले जाते.
बँक लोन देताना आपल्या ग्राहकांना 3 ITR ची मागणी करते. त्यामुळे तुम्हाला होम लोन, कार लोन, पर्सनल लोन घ्यायचे असेल तर ITR फाइल करणे गरजेचे आहे.

2 टॅक्स रिफंडसाठी गरजेचे 
जर तुम्ही ITR फाइल करीत असाल तर तुम्हाला टर्म डिपॉजिट सारख्या बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याज्यांवरली टॅक्स वाचवता येईल. डिविडंड इनकमवरसुद्धा टॅक्स वाचवता येऊ शकतो. ITR रिफंडच्या माध्यमातून टॅक्स क्लेम करू शकतात. जर एकूण इनकम स्त्रोतांची कमाई 2.5 लाख रुपयांहून अधिक आहे. तर कपात झालेला TDS तुम्ही पुन्हा क्लेम करू शकता.

3 पत्ता, उत्पन्न पुरावासाठी अधिकृत डॉक्युमेंट
इनकम टॅक्स असेसमेंट ऑर्डरला अधिकृत पत्त्याचा पुरावा म्हणून देखील वापरता येते. त्याचा वापर आधारकार्ड बनवण्यासाठी सुद्धा करता येतो. कंपनीच्या तर्फे कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 जारी करण्यात येतो. जो त्यांचा उत्पन्नाचा पुरावा असतो. स्वतः काम करणाऱ्या फ्री लांसरसाठी ITRफायलिंग डाक्युमेंट एक वैध इनकम प्रुफ सारखे काम करते.

4 तोट्यात क्लेम करता येते.
एका करदात्याला घाट्यात क्लेम करण्यासाठी निश्चित तारीखेला ITR फाइल करणे गरजेचे असते. हा तोटा कॅपीटल गेन्स, बिझिनेस किंवा प्रोफेशनल स्वरूपात असू शकतो. जी व्यक्ती संबधित असेसमेंट ईअरमध्ये ITR फाइल करते. इनकम टॅक्स नियमांनुसार त्याच लोकांना कॅपिटल गेन्सच्या विरुद्ध तोट्याला कॅरी फॉरवर्ड करण्याची परवानगी मिळते.

5 विजा प्रोसेसिंगसाठी गरजेचे डॉक्युमेंट
जर तुम्हाला विदेशात जायचं असेल तर इतर देशांमध्येITRची मागणी जास्त होते. यामुळे कळते की व्यक्ती टॅक्स कंप्लायंट नागरीक आहे. यामुळे विजा प्रोसेसिंग अधिकाऱ्यांना तुमची आत्ताची आर्थिक परिस्थिती आणि इनकम बाबत स्पष्ट माहिती मिळते. त्यामुळे विजा मिळायला सोपे होते.