लावा डोकं! RBI च्या योजनेत सामिल व्हा आणि जिंका तब्बल 40 लाख रुपये

जर तुम्ही 40 लाख रुपये जिंकू इच्छित असाल  तर, रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)तुम्हाला जबरदस्त संधी देत आहे. 

Updated: Nov 12, 2021, 08:00 AM IST
लावा डोकं! RBI च्या योजनेत सामिल व्हा आणि जिंका तब्बल 40 लाख रुपये title=

मुंबई : जर तुम्ही 40 लाख रुपये जिंकू इच्छित असाल  तर, रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)तुम्हाला जबरदस्त संधी देत आहे. डिजिटल पेमेंटला आणखी सुरक्षित बनवण्यासाठी पहिल्यांदा ग्लोबल हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. या हॅकेथॉनच्या माध्यमातून तुम्ही 40 लाख रुपये जिंकू शकता.

RBI ने काय म्हटलं?
आरबीआयच्या मते, हार्बिजर 2021 नावाने हॅकेथॉनसाठी 15 नोव्हेंबरपासून रजिस्ट्रेशन सुरू होईल. भारतीय रिझर्व बँकेने मंगळवारी जागतिक हॅकेथॉन  HARBINGER 2021 - इनोवेशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ची घोषणा स्मार्टर डिजिटल पेमेंट्स थीम सह केली आहे.

आरबीआयने केली घोषणा
आरबीआयने या हॅकेथॉनची घोषणा करताना म्हटले की, या हॅकेथॉनचा विषय डिजिटल पेमेंटला आणखी सुरक्षित आणि सोपं बनवणं आहे. जेणेकरून यामध्ये आणखी सुधारणा करता येईल.

पैसे जिंकण्यासाठी करावे लागणार हे काम
आरबीआयने म्हटले की, या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना उद्योगातील तज्ज्ञांशी मार्गदर्शन मिळवणे तसेच आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. येथे परीक्षण करणारी एक समिती असेल जी जिंकणाऱ्या स्पर्धकांची निवड करेल.

विजेत्याला मिळणार 40 लाखाचे बक्षिस
आरबीआयने म्हटले की, हार्बिजर 2021 चा भाग बनल्याने स्पर्धाकंना उद्योगांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. या स्पर्धेत पहिले स्थान पटकावणाऱ्या स्पर्धकाला 40 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाईल. तसेच दुसरे स्थान पटकावणाऱ्या स्पर्धकाला 20 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येईल.

या थीममधून निवडले जातील विजेते

  • नगद देवाण-घेवाणीला डिजिटल मोडमध्ये बदलण्यासाठी नवीन आणि सोप्या पद्धती शोधणे.
  • डिजिटल पेमेंटसाठी आणखी खात्रिलायक यंत्रणेचा शोध लावणे.
  • डिजिटल पेमेंट फ्रॉड आणि फसवणूकीसंबधी माहिती मिळवता येण्यासाठी सोशल मीडिया ऍनालिसिस मॉनिटरिंग टुल बनवणे.