कोणता प्राणी दूध आणि अंडी दोन्ही देतो? तुम्ही सांगु शकता याचं उत्तर

हा बुद्धीमत्तेचा खेळ असतो आणि आपण आपल्या मित्रांना असे प्रश्न विचारुन त्यांना चक्रावून सोडतो.

Updated: Mar 4, 2022, 03:14 PM IST
कोणता प्राणी दूध आणि अंडी दोन्ही देतो? तुम्ही सांगु शकता याचं उत्तर title=

मुंबई : आपण लहानपणी आपल्या मित्रांसोबत खेळ खेळतो. हा बुद्धीमत्तेचा खेळ असतो आणि आपण आपल्या मित्रांना असे प्रश्न विचारुन त्यांना चक्रावून सोडतो. असे खेळ आत्ता देखील अनेक लोकांना खेळायला आवडतात. एवढेच काय तर काही बुद्धीमत्तेचे प्रश्न सरकारी नोकरीच्या परीक्षांमध्ये देखील विचारले जाता. हे प्रश्न उमेदवाराची IQ पातळी तपासण्यासाठी विचारले जातात. मुलाखतीदरम्यान आजूबाजूच्या गोष्टी किंवा घटनांशी संबंधित प्रश्न विचारले जातात. येथे आम्ही अशाच काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहोत आणि त्याची उत्तरे देखील सांगणार आहोत. ज्यामुळे असे काही प्रश्न तुम्ही तुमच्या मित्रांना विचारुन त्यांच्यामध्ये स्मार्ट बनु शकता.

प्रश्न- कोणता प्राणी दूध आणि अंडी दोन्ही देतो?
उत्तर: प्लॅटिपस आणि एकिडना.

प्रश्न- माउंट एव्हरेस्टचा शोध लागण्यापूर्वी कोणता पर्वत सर्वात उंच होता?
उत्तर- माउंट एव्हरेस्ट. (माउंट एव्हरेस्ट हाच जगातील सर्वात उंच पर्वत होता. फक्त आपल्याला याबद्दल माहिती नव्हती)

प्रश्न- कोणत्या देशाचे दोन राष्ट्रपती आहेत?
उत्तर: सॅन मारिनो.

प्रश्न- अशी कोणती गोष्ट आहे जी थंडीतही वितळते?
उत्तर: मेणबत्ती.

प्रश्न: कोणत्या देशात दरवर्षी राष्ट्रपती निवडला जातो?
उत्तर: स्वित्झर्लंड.

प्रश्न: कोणता प्राणी जन्मानंतर 2 महिने झोपतो?
उत्तर: अस्वल

प्रश्न: कंप्यूटरला हिंदीत काय म्हणतात?
उत्तर: संगणक.

प्रश्न: कोणता प्राणी पाणी पीत नाही?
उत्तर: कांगारू उंदीर.