मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला ऑप्टिकल इल्युजन संबंधीत काही फोटो पाहायला मिळत असतात, जे आपल्या डोळ्यांना आणि मेंदूला विचार करायला भाग पाडतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु या फोटोमध्ये तुम्हाला काही शोधायचं नाही आहे. या फक्त रंग ओळखायला लावणारा फोटो आहे. जपानमधील रित्सुमेइकन विद्यापीठातील अकियोशी किटाओका यांनी अलीकडेच स्ट्रॉबेरीच्या प्रतिमेचा फोटो ट्विट शेअर केला, ज्याने अनेकांना गोंधळात टाकले.
हा फोटो जगाला वेड लावत आहे. हा व्हायरल ऑप्टिकल इल्युजन फोटो आपल्याला नसलेल्या रंगावर विश्वास ठेवण्यास भाग पाडत आहे, ज्यामुळे तुमचा मेंदू वास्तविक रंगाकडे दुर्लक्ष करतो
हा स्टॉबेरीचा फोटो पाहा आणि त्यामध्ये तुम्हाला स्टॉबेरीचा कोणता फोटो दिसत आहे हे, पाहा.
तुम्हाला दिसणार्या स्ट्रॉबेरीचा रंग काय आहे? तो निळा आहे की लाल? की सभोवताली निळसर प्रकाश दिसतोय आणि त्यात लाल रंगाची छटा आहे?
परंतु हे लक्षात घ्या की, तुमचा मेंदू तुमच्याशी खोटे बोलू लागला आहे, चला जाणून घेऊया की, नक्की काय घडलंय.
2色法によるイチゴの錯視。この画像はすべてシアン色(青緑色)の画素でできているが、イチゴは赤く見える。
Strawberries appear to be reddish, though the pixels are not. pic.twitter.com/Ginyhf61F7
— Akiyoshi Kitaoka (@AkiyoshiKitaoka) February 28, 2017
जपानी शास्त्रज्ञाने या फोटोतील लाल पिक्सेल बदलले आहेत. ज्यामुळे हे लक्षात घ्या की, चित्रात कोणतेही लाल पिक्सेल नाहीत. ज्यामुळे आपल्याला फोटोमध्ये स्ट्रॉबेरी लाल रंगाची दिसत नाहीय.
बऱ्याच लोकांना ती निळी, राखाडी किंवा चॉकलेटी रंगाची दिसत आहे.
परंतु तुम्ही जर या फोटोला नीट पाहिलात, तर तुमच्या लक्षात येईल की, यामध्ये स्ट्रॉबेरी लाल रंगाची दिसत आहे.