मुंबई : गेल्या वर्षभरात कॅन्सर सारख्या दुर्धर आजारात ३०० टक्क्यांची वाढ झाली आहे. यात गुजरातसह कर्नाटक आणि महाराष्ट्रातील रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. नॅशनल हेल्थ प्रोफाईलने केलेल्या सर्वेक्षणात वर्ष २०१७ आणि १८ मध्ये निदान केंद्रात ३२४ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१८ साली निदान केंद्रांना भेट देणाऱ्यांची संख्या ६.५ कोटी होती. यातील १.६ लाख लोकांना कॅन्सर असल्याचे आढळलं. तज्ज्ञांच्या मते बदलती जीवनशैली, तणाव, खानपानाच्या बदलत्या सवयी आणि अल्कोहोलचे वाढलेले सेवन यामुळे ही वाढ झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मोठ्य़ा प्रमाणात वाढ होतांना पाहायला मिळत आहे. ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. कॅन्सर होऊ नये म्हणून लोकांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. पॅक्ड जूस, नॉन स्टीक कुकवेयर आणि प्लॉस्टिकच्या भांडे वापरु नये.
पद्मश्री डॉ. एस. एच. आडवाणी हे गेल्या ३८ वर्षांपासून कॅन्सरवर उपचार करत आहेत. त्यांनी म्हटलं की, कॅन्सर झालेल्या व्यक्तीला असं वाटतं की मी आता वाचणार नाही. पण असं नाही.
डॉ. अजीत उपाध्याय म्हणतात की, 'आपण नैसर्गिक आहार सोडून बंद डब्यातील आहार निवडतो. हे कॅन्सरचं सर्वात मोठं कारण आहे. त्यामुळे यापासून वाचलं पाहिजे.'