कोरोनात नोकरी गमावलेल्यांना सरकारचा मोठा दिलासा, PF बाबत मोठी घोषणा

केंद्र सरकारने (Central Government) अडचणीत सापडलेल्या देशवासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

Updated: Jun 28, 2021, 09:35 PM IST
कोरोनात नोकरी गमावलेल्यांना सरकारचा मोठा दिलासा, PF बाबत मोठी घोषणा title=

मुंबई : केंद्र सरकारने (Central Government) आज सोमवारी कोरोना विरुद्ध अडचणीत सापडलेल्या देशवासियांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 31 मार्च 2022 पर्यंत  वाढवण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 लाख 42 हजार लाभाऱ्थ्यांसाठी 902  कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच नव्या घोषणेनुसार, सरकार खासगी कंपन्यांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांच्या नेमणुका झाल्यास पीएफ खात्यातील कर्मचार्‍यांचा वाटादेखील सरकार देईल. (Central Government big announcement regarding PF those who lost their jobs during Corona period will get this relief) 

...तर सरकार पीएफ भरणार

या योजनेअंतर्गत,  कंपनीत 1 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी असल्यास, पीएफचे दोन्ही हिस्से सरकार भरेल. ज्या कंपन्यांमध्ये 1 हजार हून अधिक कर्मचारी आहेत, त्या कर्मचार्‍यांचा 12 टक्के वाटा सरकार १२% देणार. ही योजना 1 ऑक्टोबर 2020 रोजी लागू करण्यात आली होती जी 30 जून 2021 पर्यंत होती, आता त्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
 
कोरोनात नोकरी गमावलेल्यांना दिलासा

या योजनेनुसार, दरमहा 15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्याला या योजनेचा लाभ मिळेल. कोरोनामुळे 1 मार्च 2020 ते 30 सप्टेंबर 2020 दरम्यान नोकरी गमावलेल्यांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार 1 ऑक्टोबर 2020 रोजी किंवा त्यानंतर कार्यरत पात्र कर्मचार्‍यांना 2 वर्षांसाठी अनुदानही देईल.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | राज्यात कोराना रुग्णसंख्येत घट, दिवसभरात किती नवे रुग्ण?

'व्यापारी म्हणतात, कोरोनासे नही साहब, लॉकडाऊन से डर लगता है!'

केंद्रीय अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या योजना जाहीर