मुंबई: दोन मित्र एकमेकांशी भांडत असताना एखाद्या प्राण्याला ते समजावं आणि त्याने भांडण सोडवावं ही कल्पनाच किती सुंदर आहे. ही कल्पनाच नाही तर असं प्रत्यक्षात एका ठिकाणी घडलं आहे. एका मेंढीनं जोरदार भांडण सुरू असलेल्या मित्रांमध्ये मध्यस्ती केली आणि भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. या मेंढीची भांडण सोडवण्यासाठीची धडपड पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटलं. या मेंढीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शांतता आणि समंजस्याने एकमेकांशी वागणाऱ्या या मेंढीला शांतीदूत असं कॅप्शन देऊन IFS अधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. रूपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की दोन बदकं एकमेकांसोबत भांडत आहेत आणि त्यांचं भांडण सोडवण्यासाठी मेंढीनं मध्यस्ती केली आहे.
Indeed BLESSED ARE #PEACEMAKERS#शांतिदूतpic.twitter.com/DEs9anSMEp
— Rupin Sharma IPS (@rupin1992) June 27, 2021
ही बकरी बजरंग दलाची आहे असं अंदाज अनेकांनी लावला आहे. ही मेंढी हस्तक्षेप करीत आहे जणू ती शांती निर्मात्याच्या रूपात आली आहे असं आयएफएस अधिकाऱ्याने म्हटलं आहे. या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही येत आहेत. एका वापरकर्त्याने मेंढीबद्दल लिहिले आहे की, 'बजरंग दल का लगता है', इतके लोक हसणार्या इमोजीसह व्हिडिओचा आनंद घेत आहेत.