पीएफबाबत गुडन्यूज, व्याजदर वाढीवर शिक्कामोर्तब

 पीएफधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. 

PTI | Updated: Sep 24, 2019, 11:38 PM IST
पीएफबाबत गुडन्यूज, व्याजदर वाढीवर शिक्कामोर्तब title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : पीएफधारकांसाठी एक चांगली बातमी आहे. चालू आर्थिक वर्षासाठी व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. २०१८-२०१९साठी भविष्य निर्वाह निधीवर (पीएफ) ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. व्याजदर वाढीवर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर केंद्रीय कामगार मंत्रालयाने याबाबत मंगळवारी एक अधिसूचना प्रसिद्ध केली आणि गुडन्यूज दिली आहे.

देशभरातील सहा कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात गेल्या आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के दराने लवकरच व्याज जमा केले जाईल, असे कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी स्पष्ट केले आहे. व्याजदरांत ०.१० टक्के वाढ करण्यात आली आहे. २०१७-१८ या वर्षात पीएफच्या व्याजदर ८.५५ इतका होता. आता यात वाढ करण्यात आल्याने तो दर ८.६५ करण्यात आला आहे.

दरम्यान, तुम्हाला पीएफचे सर्व पैसे एनपीएसमध्ये वर्ग करण्याचा पर्याय मिळू शकेल. नवीन नोकरीत सामील होताना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना किंवा राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना निवडण्याचा पर्याय असेल. एनपीएसच्या माध्यमातून तुम्ही शेअर भविष्यात भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) गुंतवू शकता, असा पर्याय लवकरच तुम्हाला मिळू शकेल. इतकेच नाही तर नव्या नोकरीत सामील होताना तुम्हाला ईपीएफ योजना घ्यायची आहे की एनपीएस देखील विचारले जाईल. या महत्त्वपूर्ण विषयावर मंगळवारी कामगार मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. सरकार या निर्णयाच्या बाजूने आहे आणि पहिला मसुदा जारी करताना लवकरच ही प्रक्रिया राबविण्याची शिफारस करीत आहे.