नवी दिल्ली : तोट्यात असणाऱ्या १९ मोठ्या कंपन्या बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. यामध्ये एचटीएम, हिंदुस्तान केबल्स आणि इंडियन ड्रग्स या बड्या कंपन्यांचाही समावेश आहे. मंगळवारी लोकसभेमध्ये काँग्रेसचे खासदार अदूर प्रकाश यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली.
प्रकाश यांनी अवजड उद्योग आणि लोक उद्योग मंत्रालयाला सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या सध्या परिस्थितीबद्दल माहिती देण्याची विनंती केली. या प्रश्नाला उत्तर देताना मोदी सरकारमधील केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांची माहिती दिली.
याचवेळी सावंत यांनी तोट्यात चालणाऱ्या १९ सरकारी कंपन्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे सांगत या कंपन्यांची यादी जाहीर केली.