मुंबई : कोरोनाच्या (Covdi 19) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. या कोरोनामुळे ज्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली, त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Government) हा मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. या निर्णयामुळे अडचणीत सापडलेल्या कर्मचारी वर्गाला काही प्रमाणात का होईना, पण थोडा तरी दिलासा मिळणार आहे. (Central government will pay provident fund contribution for both the employer and the employee till 2022)
काय आहे दिलासादायक निर्णय?
ज्यांनी कोरोनाच्या काळात नोकऱ्या गमावल्या आहेत त्यांच्या खात्यात सरकार पीएफ (Provident Fund) जमा करणारंय. त्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) एक मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी ही घोषणा केलीय. तुम्हाला हा पीएफ नेमका कसा मिळेल हे आपण जाणून घेणार आहोत.
कसा मिळेल पीएफचा लाभ ?
ज्यांनी कोरोना काळात नोकरी गमावलीय त्याचं EPFOमध्ये रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. 2022 पर्यंत केंद्र सरकार त्यांच्या खात्यात पीएफचे पैसे जमा करेल. ज्यांचा पगार 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा लोकांनाच या योजनेचा लाभ मिळेल.
याशिवाय कोरोना काळात बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यानं मनरेगाचं बजेट 60 हजारांवरून 1 लाख कोटी रूपये करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचं आर्थिक गणित कोलमडलंय. हातावरचं पोट असणाऱ्यांची अवस्था बिकट झालीय. केंद्राच्या या दोन्ही निर्णयांमुळे सामान्यांना निश्तिच थोडासा दिलासा मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.