दमदार मायलेज देणारी बाईक अर्ध्या दरात, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी

बाईक घेणाऱ्यांसाठी एक खास ऑफर आहे. ही बाईक तुम्हाला अर्ध्या दरात खरेदी करता येणार आहे.

Updated: Aug 22, 2021, 08:25 PM IST
दमदार मायलेज देणारी बाईक अर्ध्या दरात, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी title=

मुंबई : जर तुम्ही बाईक खरेदी करण्याच्या बेतात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बाईक घेणाऱ्यांसाठी एक खास ऑफर आहे. बजाज डीसकव्हर 100Std (Bajaj Discover 100Std) ही बाईक अवघ्या 25 हजारात खरेदी करता येणार आहे. या बाईकची विक्री CredR  या वेबसाईटवरुन केली जात आहे. CredR सेंकड हॅन्ड बाईक्स आणि स्कूटर खरेदी आणि विक्री करणारी वेबसाईट आहे. ही बाईक खरेदी केल्या सोबत अनेक फायदे होणार आहेत. (Get Bajaj Discover 100Std second hand bike for only 25 thousand rupees find out the details and offers)

CredRवर Bajaj Discover 100Std  या बाईकची विक्री आधी 28 हजार रुपयांनी केली जात होती. मात्र त्या दरात आणखी 3 हजार रुपयांनी घट केली आहे. त्यामुळे ही  बाईक 25 हजारात खरेदी करता येणार आहे. ही फर्स्ट ओनर बाईक आहे, म्हणजेच सेकंड हॅन्ड बाईक. ही सेकंड हॅन्ड बाईक आतापर्यंत 20 हजार 160 किलोमीटर पर्यंत चालवण्यात आली आहे. ही बाईक खरेदी केल्यास सोबत 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 5 हजार किंमत असलेली 6 महिन्यांची वॉरन्टी आणि आरसी ट्रान्सफर सुविधाही मिळेल.  

फक्त 399 रुपयांमध्ये बाईक दारात

वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार,  ही एक बेस्ट प्राईजवाली Refurbished Bike आहे. या बाईकबाबत तुम्हाला फक्त नाव आणि  मोबाईल नंबर टाकून अधिक माहिती जाणून घेता येईल. तसेच बाईक खरेदी केल्यानंतर घरी आणण्यासाठी फक्त 399 रुपये मोजावे लागतील. तसेच बाईकबाबत तुम्हाला शोरुममध्ये जाऊनही अधिक माहिती घेता येईल.  

बाईकबाबत थोडक्यात... 

या बाईकचं इंजिन हे 109cc इतकं आहे. विशेष म्हणजे ही बाईक हफ्त्यांवरही (EMI) घेता येणार आहे. बाईकबाबत अधिक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

(https://www.credr.com/all-used-bikes-in-Chittorgarh-Chittorgarh/Bajaj-Di...)

या गोष्टीकडे लक्ष द्या.... 

सेकंड हॅन्ड बाईक खरेदी करताना सर्व नीट तपासून पाहा. तसेच बाईकचे आरसी बूक, इंश्युरंस यासारखे सर्व डॉक्युमेंट्सही पाहून घ्या. बाईकची कंडीशन कशी आहे, याकेड लक्ष द्या. सेंकड हॅन्ड बाईक घेताना या बाबींकडे लक्ष द्या नाहीतर, तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं.