नवी दिल्ली : यापुढं हॉटेल, रेस्टॉरंट आणि मल्टिप्लेक्समध्ये मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी छापील किंमतीपेक्षा जास्त रक्कम आकारल्यास हॉटेल व्यवस्थापकाला कारावास भोगावा लागणार आहे.
ग्राहकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी अशाप्रकारच्या शिक्षेची आणि दंडाची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्र सरकारच्या वतीनं सुप्रीम कोर्टात देण्यात आली.
अनेकदा मिनरल वॉटरच्या बाटलीसाठी जादा किंमत आकारली जाते. छापील किंमतीपेक्षा जास्त रक्कम आकारणं हे ग्राहकांच्या अधिकारांचं हनन आहे. यामुळं करचोरीला प्रोत्साहन मिळतं तसंच सरकारचं नुकसान होतं, अशा आशयाची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय. त्या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारनं हा खुलासा केलाय.