काही तासातच सुरु होणार चंद्रग्रहण, जाणून घ्या ग्रहणाची वेळ

काही वेळेतच सुरु होणार चंद्रग्रहण

Updated: Jun 5, 2020, 09:11 PM IST
काही तासातच सुरु होणार चंद्रग्रहण, जाणून घ्या ग्रहणाची वेळ title=

मुंबई : या वर्षातील दुसरे चंद्रग्रहण काही तासांत सुरु होणार आहे. चंद्रग्रहण रात्री 11:15 वाजता सुरू होईल. हे चंद्रग्रहण मध्यरात्री 2.34 मिनिटांनी संपेल. या चंद्रग्रहणात चंद्र त्याच्या पूर्ण आकारात दिसेल. हे ग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका आणि भारतामध्येही पाहिले जाऊ शकते.

दुर्बिणीच्या सहाय्याने हे चंद्रग्रहण खूप सुंदर दिसू शकेल. आपण व्हर्च्युअल टेलीस्कोपच्या सहाय्याने www.virtualtelescope.eu वर हे पाहू शकता. या व्यतिरिक्त आपण हे CosmoSapiens, Slooh या यूट्यूब चॅनेलवर थेट पाहू शकता.

सूर्यग्रहणाच्या विपरीत, चंद्रग्रहणाची घटना उघड्या डोळ्याने पाहिली जाऊ शकते. त्याचा डोळ्यावर कोणताही परिणाम होत नाही. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार चंद्रग्रहण रात्रीच्या वेळी सहज पाहिले जाऊ शकते. कारण रात्रीच्या वेळी कोणतेही हानिकारक किरण वातावरणात नसतात. चंद्रग्रहण पाहण्यासाठी चष्मा घालणे आवश्यक नाही.

जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान येते, तेव्हा सूर्याचा संपूर्ण प्रकाश चंद्रावर पडत नाही, त्याला चंद्रग्रहण म्हणतात. चंद्रग्रहणात सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एक ओळीत येतात. वर्षामध्ये चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जास्तीत जास्त तीन वेळा जातो तेव्हा चंद्रग्रहण होते.

पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण नसते. याचे कारण पृथ्वीच्या कक्षावर चंद्राची कक्षा वाकलेली आहे. हा कल सुमारे 5 अंशापर्यत आहे. म्हणून प्रत्येक वेळी चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करत नाही. तो वरुन किंवा खालून निघून जातो. हीच गोष्ट सूर्यग्रहणाबद्दलही आहे.

या वर्षातील पहिले चंद्रग्रहण 10 जानेवारी रोजी तर दुसरे चंद्रग्रहण आज आहे. यानंतर 21 जून रोजी सूर्यग्रहण होईल आणि पुन्हा 5 जुलैला चंद्रग्रहण असेल.