जगातला सर्वात उंच रेल्वे पूल भारतात, आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल

आता एक बातमी अभिमानानं आपली मान उंचवणारी. काश्मीरच्या अत्यंत दुर्गम भागात अनेक अशक्य बांधकामे करण्यात येत आहेत.  

Updated: Feb 27, 2021, 07:34 PM IST
जगातला सर्वात उंच रेल्वे पूल भारतात, आयफेल टॉवरपेक्षाही उंच पूल
Pic Courtesy: ANI

मुंबई : आता एक बातमी अभिमानानं आपली मान उंचवणारी. काश्मीरच्या अत्यंत दुर्गम भागात अनेक अशक्य बांधकामे करण्यात येत आहेत. त्यात भर पडणार आहे एका अतिविशाल रेल्वे पुलाची. हा पूल नेमका कुठे आहे, कसा आहे, बघुयात. (India has the tallest railway bridge in the world, even taller than the Eiffel Tower)

कुणी म्हणतं हे आश्चर्य आहे. कुणी म्हणतं हे अद्भूत आहे. कुणी म्हणतं अविश्वनीय आहे. कुणासाठी हे स्वप्नवत आहे.. तर कुणासाठी शेकडो किलोमीटरचा वळसा वाचवणारं आहे आणि अमाप संधी उघडणारा राजमार्ग आहे... यातून सगळ्या जगाला भारतीय इंजिनियर्सची अजोड बुद्धिमत्ता दिसलीये. भुगोल आणि विज्ञानाची सगळी सर्व आव्हानं झेलत हा अतिविशाल पूल उभारला जातोय... पॅरीसचा आयफेल टॉवरही त्याच्यापुढे खुजा ठरेल... 

कटडा-बनिहालदरम्यान रियासी इथं चिनाब नदीवर हा पूल उभारला जात आहे. काश्मीर खोऱ्याला देशाशी रेल्वेने जोडणारा हा मार्ग आहे. स्थानिकांसाठी अनेक संधी यामुळे खुल्या होणार आहेत. हा पुल उभारण्याचं काम जोरात सुरू आहे. आयफेल टॉवरपेक्षा उंच आणि इंद्रधनुष्यासारखी कमान असलेला हा पूल जगातलं एक आश्वर्य ठरणार आहे.