Exit polls: छत्तीसगढमध्ये भाजपला धक्का; काँग्रेसच्या आश्चर्यकारक मुसंडीचा अंदाज

एक्झिट पोलने हे सर्व अंदाज खोटे ठरवले आहेत.

Updated: Dec 7, 2018, 08:30 PM IST
Exit polls: छत्तीसगढमध्ये भाजपला धक्का; काँग्रेसच्या आश्चर्यकारक मुसंडीचा अंदाज title=

नवी दिल्ली: संपूर्ण देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे मतदानोत्तर अंदाज (एक्झिट पोल) शुक्रवारी जाहीर झाले. यामध्ये छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलची आकडेवारी पाहून अनेकांना धक्का बसला. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या छत्तीसगढमध्ये यंदाही भाजप विजयासाठी मोस्ट फेव्हरिट मानला जात होता. मात्र, एक्झिट पोलने हे सर्व अंदाज खोटे ठरवले आहेत. काही एक्झिट पोलच्या आकेडवारीनुसार याठिकाणी भाजप-काँग्रेसमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळेल. तर एक्सिस माय इंडिया आणि सी-व्होटरने काँग्रेस छत्तीसगढमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तवला आहे. 

न्यूज नेशन
भाजप-४० , काँग्रेस-४२, इतर-८-१०

जन की बात
भाजप-४४, काँग्रेस-४०, इतर-६

एक्सिस माय इंडिया
भाजप-२६, काँग्रेस-६०, इतर-४-१

इंडिया टीव्ही
भाजप ४२ ते ५०, काँग्रेस- ३२ ते ३८, बसपा- ६ ते ८, इतर- १ ते ३-०

सी-व्होटर
भाजप-३९, काँग्रेस-४६, इतर-५०

टाईम्स नाऊ-सीएनक्स
भाजप ४६, काँग्रेस-३५, इतर-९

छत्तीसगढमध्ये यावेळी ७६.३५ टक्के इतके मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील १८ जागांसाठी ७६.३९ तर दुसऱ्या टप्प्यातील ७२ जागांसाठी ७६.३५ टक्के इतके मतदान झाले. याठिकाणी मुख्यमंत्री रमण सिंह हा भाजपचा हुकमी एक्का मानला जात होता. रमण सिंह सरकारने गरीबांसाठी राबविलेल्या कल्याणकारी योजनांमुळे भाजपला याठिकाणी पुन्हा सत्ता मिळेल, असा अंदाज होता. गेल्या निवडणुकीत भाजपला य़ाठिकाणी ४९ तर काँग्रेसला ३९ जागांवर विजय मिळाला होता.