जोधपूर: नरेंद्र मोदी यांना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी ख्रिश्चन आणि इस्लामी देशांकडून विरोधकांना निधी पुरवला जात असल्याचा खळबळजनक आरोप योगगुरू रामदेव बाबा यांनी केला. ते बुधवारी जोधपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, भारताची सत्ता पुन्हा मोदींच्या हाती जाऊ नये, यासाठी देशांतर्गत आणि परदेशातील देशविघातक शक्तींकडून प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये अनेक ख्रिश्चन आणि इस्लामिक देशांचा समावेश असून त्यांच्याकडून यासाठी निधी पुरवला जात असल्याचेही रामदेव बाबा यांनी सांगितले.
Yog-Guru Ramdev in Jodhpur, Rajasthan: Anti-national powers within and outside the country and many Christian & Islamic countries are funding thousands of crores of rupees to prevent Modi from coming to power. pic.twitter.com/Fo0BYm4gTN
— ANI (@ANI) April 17, 2019
नरेंद्र मोदी यांचे चारित्र्य स्वच्छ आहे. राष्ट्रधर्माला कर्म मानून ते देशाची सेवा करतात. देशातील शेतकरी, सामान्य वर्ग, सीमेवरील जवान यांच्या भविष्यासाठी ते काम करत आहेत. अनेक विकासकामे त्यांनी देशात केली.
देशातील लोकांच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी जगतात. नरेंद्र मोदींनी देशाचे असे काय वाईट केले, असा सवालही रामदेव बाबांनी यावेळी विरोधकांना विचारला. तसेच आगामी निवडणुकीत जनता पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच निवडून देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.