लोकसभेत नागरिकत्व संशोधन विधेयक २०१९ सादर

लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर

Updated: Dec 9, 2019, 11:00 PM IST
लोकसभेत नागरिकत्व संशोधन विधेयक २०१९ सादर title=

नवी दिल्ली : बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं. मात्र हे विधेयक मांडण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडांजगी झाली. अखेर या विधेयकाच्या चर्चेसाठी मतदान घेण्यात आलं. चर्चेच्या बाजूनं २९३ मतं पडली तर विरोधात ८२ मतं पडली. हे विधेयक अल्पसंख्याकविरोधी असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. घटनेच्या मूळ तत्त्वाविरोधातच हे विधेयक असल्याचा आरोप काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी केला. मात्र या विधेयकात मुस्लिमांचा उल्लेखच नसल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमति शाह यांनी केला.

काँग्रेस, टीएमसीसह काही विरोधी पक्षाने या विधेयकाला विरोध केला होता. हे विधेयक संविधानाच्या विरोधात असल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं. सोमवारी लोकसभेत 375 खासदार उपस्थित होते.नागरिकत्व सुधारणा विधेयक आज गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडलं. या विधेयकात धर्माच्या आधारावर सुधारणा करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तसंच राष्ट्रवादीनेही या विधेयकाला विरोध केला आहे. मात्र राज्यातल्या सत्तेत भागीदारी असलेल्या शिवसेनेनं मात्र पाठिंबा दिला आहे. 

अपडेट १२:३०

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर केलं. त्यानंतर विरोधकांनी प्रचंड गोंधळ घालत विधेयकाला विरोध केला. नागरिकत्व सुधारणा कायदा अल्पसंख्याकविरोधात असल्याचा विरोधकांचा आरोप काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी केला. विधेयक घटनेच्या मूळ तत्त्वाविरोधात असल्याचा आरोप काँग्रेसनं केला. तर प्रत्येक आक्षेपाला उत्तर देणार, प्रत्येक शंकेचं निरंसन करू मात्र त्यावेळी सभात्याग करू नका असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.

अपडेट १२:२०

नागरिकत्व सुधारणा विधेयक सादर होण्याआधी लोकसभेत गोंधळ पाहायला मिळाला. काँग्रेस खासदाराने शुक्रवारी केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांच्या विरोधात जी टीका केली होती. त्यादरम्यान ते त्यांच्या दिशेने पुढे देखील आले होते. यावर भाजप खासदारांनी आक्षेप घेत माफी मागण्याची मागणी केली होती.

अपडेट १२:१०

आसाममध्ये या विधेयकांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं.