'तुम्ही कसे आहात?' विचारणाऱ्या सोफियाला देशाच्या नागरिकत्वाचा प्रस्ताव

सोफिया एक सोशल रोबोट आहे.

Updated: Oct 17, 2019, 02:36 PM IST
'तुम्ही कसे आहात?' विचारणाऱ्या सोफियाला देशाच्या नागरिकत्वाचा प्रस्ताव title=

मुंबई : 'नमस्ते, कसे आहात तुम्ही?' असा प्रश्न नेहमी माणसं एकमेकांना विचारतात. परंतु इकडे तर चक्क एक रोबोट एखाद्या सजीव व्यक्ती प्रमाणे 'कसे आहात?' म्हणून विचारताना दिसत आहे. हा आवाज सोफिया नावाच्या एका रोबोटचा आहे. सोफिया एक सोशल रोबोट आहे. सोफिया चक्क हिंदी भाषेमध्ये संवात साधते. त्याचप्रमाणे सोफिया चित्र देखील काढू शकते. शिवाया सोफियाचे हाव-भाव देखील एका सामान्य व्यक्तीप्रमाणे आहेत.  
 
देशाच्या नागरिकत्वाचा प्रस्ताव मिळालेली सोफिया जगातील एकमेव रोबोट आहे. सोफिया तर आहेच पण अल्बर्ट आइंस्टाइन नावाचा रोबोट देखील एका व्यक्तीचं प्रतिबींबच आहे. वेगळ्या अंदाजात 'गो क्रेझी' म्हणतो तो लोकांचे मनोरंजन  करतो. 

त्यानंतर नाउ रोबोट तर सर्वांपेक्षा वेगळा रोबोट आहे. हा रोबोट तर चक्क 'गंगनम स्टायल' गाण्यावर ठेका धरतो. दिल्लीमध्ये रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर एक परिषद चालू आहे. १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी या परिषदेचं शेवट होणार आहे. 

भारतीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायातील रोबोटिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा या परिषदेचा मानस आहे.