मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उद्या (Delhi Tour) दिल्लीला जाणार आहेत. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे देखील दिल्लीला जाणार आहेत. (cm eknath shinde dcm devendra fadanvis and assembly speker rahul narvekar will delhi tour on 8 july)
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच दिल्लीवारी असणार आहे. तर राहुल नार्वेकर यांचीही ही पहिलीच वेळ आहे.
राज्यात सत्तास्थापनेनंतर आता सर्वांना मंत्रिमंडळाबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. या मंत्रिमंडाच्या विस्ताराबाबत चर्चा सुरू आहे. या दरम्यान हे तिघेही महत्त्वाचे नेते दिल्लीला जाणार आहेत. हे तिन्ही महत्त्वाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ते या नेत्यांशी चर्चा करतील, असं म्हटलं जात आहे.
पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांच मत आहे की 9 जुलैला मंत्रीमंडळ विस्तार करावा. तर काहींचं मत हे 13 जुलैनंतर करावा, असं मत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत फडणवीस दिल्लीत चर्चा करतील असं समजतंय, त्यामुळे आता या बैठकीत काय होतं आणि नक्की काय ठरतंय, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.