मित्राला भेटण्यास आलेल्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

मित्राला भेटायला आलेल्या तरूणीवर बालात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक असे की, या प्रकाराचा व्हिडिओही बनविण्यात आला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 27, 2017, 09:17 PM IST
मित्राला भेटण्यास आलेल्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल title=
छायाचित्र सौजन्य - यूट्यूब

हैदराबाद : मित्राला भेटायला आलेल्या तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना पुढे आली आहे. धक्कादायक असे की, या प्रकाराचा व्हिडिओही बनविण्यात आला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.

आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात हा प्रकार घडला. १९ वर्षाच्या एका मुलीवर कॉलेजमधील तिच्या एका मित्राने अत्याचाराचा प्रयत्न केला आहे. ही तरूणी आपल्या मित्रास भेटण्यास गेल्यावर हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. तरूणीच्या मित्राने तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न केला. तसेच, आपल्या मित्रांच्या मदतीने या किळसवाण्या प्रकाराचे मोबाईल शूटींगही केले. आरोपी केवळ शूटींग करूनच थांबला नाही. तर, त्याने हा व्हिडिओ शोशल मीडियावरही टाकला. पाहता पाहात... हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

व्हिडिओमध्ये तरूणाने तरूणीसोबत केलेले वर्तन इतके घृणास्पद आहे की, या व्हिडिओवर प्रचंड टीका होत आहे. आरोपी तरूणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तरूणी वारंवार पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर, आरोपी तरूण तिला पुन्हा पुन्हा पकडून अश्लिल चाळे करत आहे. आरोपी तरूण इतका बेभान झाला आहे की, त्याने पीडितेची कपडे उतरवण्याचाही प्रयत्न केल्याचे व्हिडिओत निदर्शनास येत आहे. दरम्यान, पीडितेची मदत करण्यासाठी एक तरूणी पुढे येताना व्हिडिओत दिसते आहे. मात्र आरोपी तिच्या हाताला झटका देताना दिसत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता आपल्या आरोपी मित्र बी साईला भेटण्यासाठी एका मंदिरात गेली होती. पीडितेने म्हटले आहे की, ती आरोपीला मागील एक वर्षापासून ओळखते. घडल्या प्रकाराची पीडितेने कुठेही वाच्यता केली नव्हती. मात्र, आरोपीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याचे समजताच तिने आपल्या घरी हा प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत, मुख्य आरोपीसह दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी म्हटले आहे की, ताब्यात घेण्यात आलेल्या युवकामध्ये कार्तिका नावाच्या एका तरूणीचाही समावेश आहे. पीडिता या तरूणी मैत्रिण होती.